Ashes 2nd Test : सामना अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश; गांगुलीनं इतर देशांना दिला 'हा' सल्ला!

Ashes 2nd Test : सामना अनिर्णित राखण्यात ऑस्ट्रेलियाला यश; गांगुलीनं इतर देशांना दिला 'हा' सल्ला!

दुसऱ्या कसोटीती अनिर्णित राहू नये यासाठी इंग्लंडची धडपड सुरू होती. त्यातला एक फोटो व्हायरल होत असून अकराव्या खेळाडूची काळजी वाटत असल्याचं एका युजरनं म्हटलं आहे.

  • Share this:

लॉर्डस, 19 ऑगस्ट : अत्यंत प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या अॅशेस कसोटी मालिकेतील दुसरा सामना अनिर्णित राहीला. अकेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला 48 षटकांत 267 धावांचे आव्हान मिळाले होते. दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला 6 बाद 154 धावांत रोखले. यासाठी इंग्लंडने अखेरच्या सत्रात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात केलेल्या कामगिरीनं सर्वांचीच मनं जिंकली. तर दुसऱीकडे ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात स्टीव्ह स्मिथच्या अनुपस्थितीत सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं.

इंग्लंडने जोफ्रा आर्चर आणि जॅक लीच यांच्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्यात पुनरागमन केलं. मात्र, स्मिथच्या जागी बदली खेळाडू म्हणून उतरलेल्या मार्नस लाबुशेननं 59 धावांची खेळी केली. दरम्यान अखेरच्या सत्रात ज्या पद्धतीचा खेळ दोन्ही संघांनी दाखवला त्याचं कौतुक होत आहे. इंग्लंडला विकेट हव्या होत्या तर ऑस्ट्रेलियाला सावध खेळी. दोन्ही संघांनी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले.

भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीनेसुद्धा अॅशेस कसोटीतील खेळाचं कौतुक केलं आहे. त्यानं ट्विटरवरून म्हटलं की, अॅशेस मालिकेनं कसोटी क्रिकेट जिवंत ठेवलं आहे. आता इतर देशांनी त्यांची कामगिरी उंचावली पाहिजे.

शेवटची काही षटके राहिली असताना इंग्लंडने यष्टीरक्षकासह तब्बल 9 क्षेत्ररक्षक फलंदाजाच्या भोवती उभा केले होते. हा फोटो आयसीसीनंसुद्धा शेअर केला आहे. आयसीसीनं म्हटलं आहे की, सोमवारी सकाळी कामाचे ईमेल चेक करताना मी! इंग्लंडनं लावलेल्या या फिल्डिंगच्या फोटोवर अनेक मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. एका युजरनं म्हटलं आहे की, मला त्या 11 व्या खेळाडूबद्दल वाईट वाटत आहे जो एकटाच बाजूला कुठेतरी उभा आहे. त्यानंतर अनेकांनी 11 वा खेळाडू कुठं आहे असं विचारलं आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात जवळपास पाच सत्रांचा खेळ वाया गेला. अखेरच्या दिवशी पावसामुळे एक तास उशिरा सामना सुरू झाला. यामुळेच सामना अनिर्णित राहिला. सामना अनिर्णित राहिला असला तरी ऑस्ट्रेलियानं पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यांनी एजबस्टनमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत 251 धावांनी विजय मिळवला होता.

इंग्लंडने पहिल्या डावात 258 धावा केल्या होत्या. तर ऑस्ट्रेलियाचा डाव 250 धावांत संपुष्टात आला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडने बेन स्टोक्सच्या शतकाच्या जोरावर 258 धावांवर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियासमोर 267 धावांचे आव्हान ठेवलं होतं. दुखापतीमुळं स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या डावात खेळू शकला नाही. त्याच्या जागी खेळणाऱ्या लोबुशेननं अर्धशतकी खेळी करत सामना अनिर्णित राखण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.

SPECIAL REPORT : काय आहे कोहिनूर मिल प्रकरण, राज यांना का बजावली नोटीस?

Published by: Suraj Yadav
First published: August 19, 2019, 2:56 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading