Ashes : 3 खेळाडूंचे बंदीनंतर पुनरागमन तर एकाचे पदार्पण!

प्रतिष्ठेच्या अॅशेस कसोटी मालिकेला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये वर्ल्ड कप गाजवलेल्या खेळांडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

  • Share this:

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 1 ऑगस्टपासून अॅशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. जगज्जेत्या इंग्लंडचा आत्मविश्वास उंचावला आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून बेनक्राफ्ट बंदीनंतर पुनरागमन करणार आहेत.  यंदा अॅशेस मालिकेत इंग्लंडच्या जेसन रॉ़य, जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन तर ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क यांच्यावर लक्ष असणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी करताना वॉर्नरने 674 धावा फटकावल्या. यात त्याच्या तीन शतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं. वॉर्नरने आतापर्यंत 74 कसोटी खेळल्या असून 21 शतकांसह 6 हजार 363 धावा केल्या आहेत. गेल्या वेळी अॅशेस मालिकेत त्यानं 5 अर्धशतकं केली होती.

इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयने फक्त एकच कसोटी खेळली आहे. यात त्यानं 77 धावा केल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये जेसन रॉयनं 7 डावात 443 धावा केल्या होत्या. इंग्लंडचा माजी कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस निवृत्त झाल्यानंतर सलामीच्या फलंदाजाची कमतरता भरून काढण्याची जबाबदारी जेसन ऱॉयवर आहे.

वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱा जोफ्रा आर्चर कसोटीत पदार्पण करणार आहे. त्यानं प्रथम श्रेणीत 28 सामन्यात 131 विकेट घेतल्या आहेत.

इंग्लंडचा जेम्स अँडरसन सर्वात अनुभवी गोलंदाज आहे. त्यानं 148 कसोटी खेळल्या असून 575 विकेट घेतल्या आहे. 18 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 31 कसोटीत 104 विकेट घेतल्या असून पाच वेळा 5 पेक्षा जास्त गडी बाद करण्याची कामगिरी केली आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कनं वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 27 विकेट घेतल्या. त्यामुळे अॅशेस मालिकेतही सर्वांची नजर त्याच्या कामगिरीकडे असेल. स्टार्कने 51 कसोटीत 211 विकेट घेतल्या असून लसिथ मलिंगानंतर त्याचा यॉर्कर जबरदस्त मानला जातो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 12 कसोटीत 51 विकेट घेतल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Jul 31, 2019 11:38 AM IST

ताज्या बातम्या