The Ashes : जमिनीवर पडला पण थांबला नाही! स्मिथच्या अजब स्टाईलनं प्रेक्षकही चक्रावले

The Ashes : जमिनीवर पडला पण थांबला नाही! स्मिथच्या अजब स्टाईलनं प्रेक्षकही चक्रावले

स्मिथनं लाबुशेनसोबत 116 धावांची शतकी भागीदारी केली.

  • Share this:

मॅंचेस्टर, 05 सप्टेंबर : अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशीचा खेळ पावसात वाया गेला. तरी, चाहत्यांना स्टिव्ह स्मिथची तुफान फलंदाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या कसोटी सामन्यात जखमी झाल्यानंतर स्मिथनं पुनरागमन केले. दरम्यान या सामन्यात स्मिथनं पुन्हा एकदा जगातला नंबर 1 फलंदाज का आहे, हे सिद्ध केले. पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाला तेव्हा स्मिथ 60 धावांवर होता. दरम्यान ऑस्ट्रेलियानं 28 धावांवरच दोन विकेट गमावल्या. यावेळी स्मिथनं लाबुशेनसोबत 116 धावांची शतकी भागीदारी केली. मात्र या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले ते स्मिथच्या एक शॉटनं.

स्टिव्ह स्मिथची फलंदाजी जगातील इतर फलंदाजांपेक्षा खुप वेगळी आहे. याचमुळे त्याच्या खेळामध्ये त्यानं मारलेल्या शॉट्सच्या चर्चा जास्त रंगतात. स्टिव्ह स्मिथनं मॅंचेस्टरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात एक अजब शॉट मारला. हा शॉट मारतचं स्मिथनं आपले अर्धशतक पूर्ण केले, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्मिथनं बेन स्टोक्सच्या चेंडूवर जमिनीवर पडून ड्राईव्ह मारला आणि चेंडू सीमारेषेपार गेला. या शॉटसह स्मिथनं आपले अर्धशतक पूर्ण केले. स्मिथचा हा शॉट पाहून समालोचकांनाही हसू आवरता आले नाही.

वाचा-LIVE सामन्यात चाहत्यानं मारली तिसऱ्या मजल्यावरून उडी, पाहा थरारक व्हिडिओ

स्मिथचा जबरदस्त फॉर्म

स्मिथनं अॅशेस मालिकेत शानदार कामगिरी केली आहे. या मालिकेत त्यानं आतापर्यंत 2 शतक आणि 2 अर्धशतक लगावले आहे. स्मिथ सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाज आहे. स्मिथनं 4 सामन्यात 400चा आकडा पार केला आहे. या मालिकेत स्मिथनं सलग 8वेळा 50हून अधिक धावा केल्या आहेत. तर, पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकी कामगिरी केली. गेल्या 8 कसोटी सामन्यात फक्त इंग्लंड विरोधात 130हून अधिकच्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यामुळं मॅंचेस्टरमध्येही स्मिथचे वादळ दिसणार अशी शक्यता आहे.

वाचा-'या' दहा देशांमध्ये मिळते स्वस्त पेट्रोल, भारतापेक्षा 68 रुपयांनी आहे किंमत कमी

स्मिथ नंबर 1 खेळाडू

आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथनं मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथनं डिसेंबर 2015नंतर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावरचा खेळाडू होता. त्यानंतर चेंडू कुडतरल्यामुळं एक वर्षांची बंदी स्मिथवर लावण्यात आली होती. त्यामुळं ऑगस्ट 2018मध्ये कोहलीनं स्मिथला मागे टाकत पहिला क्रमांका पटकावला. स्मिथनं इंग्लंडमध्ये होत असलेल्या अशस मालिकेत संघात पदार्पण केले. यावेळी पहिल्या कसोटी सामन्यात स्मिथनं शतकी खेळी केली. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात 92 धावा केल्या.

वाचा-VIDEO : हरभजनची हॅट्ट्रिक झाली नसती, 18 वर्षांनी गिलख्रिस्टनं व्यक्त केलं दु:ख

जम्बो दंड भरण्यातून वाहनधारकांना मोठा दिलासा, रावतेंनी केली 'ही' घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2019 08:29 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading