नवी दिल्ली, 7 डिसेंबर: ब्रिस्बेन येथे खेळल्या जाणाऱ्याअॅशेस मालिकेतील(ashes 2021-22) पहिल्या कसोटीसाठी इंग्लंडने (england)संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी 8 डिसेंबरपासून सुरू होत आहे. दरम्यान, इंग्लंडने 12 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे, इंग्लंडने 23 वर्षीय खेळाडूला संधी दिली आहे.
जेम्स अँडरसनच्या जागी ख्रिस वोक्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी अँडरसनला दुखापत झाल्याची बातमी आली होती. मात्र आता तो फिट असल्याचे सांगितले जात आहे. जोस बटलरने पुष्टी केली की अँडरसन तंदुरुस्त आहे परंतु पहिल्या कसोटीतून त्याला विश्रांती देण्यात आली आहे जेणेकरून तो गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीत योगदान देऊ शकेल.
तसेच, मार्क वुड किंवा ख्रिस वोक्सला मैदानात उतरण्याची संधी द्यायची की नाही हे संघ व्यवस्थापन ठरवणार आहे. 12 खेळाडूंची नावे समोर आल्यानंतर आता इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनचे चित्रही जवळपास स्पष्ट झाले आहे.
जो रूट (कर्णधार), रोरी बर्न्स, जोस बटलर (विकेट कीपर), हसीब हमीद, डेव्हिड मलान, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, मार्क वुड
संघ पाहता, कर्णधार रूटशिवाय फलंदाजीची कमान हमीद, बर्न्स, बटलर, ओली पोप आणि मलान यांच्या खांद्यावर असेल हे स्पष्ट होते. तर बेन स्टोक्स अष्टपैलूच्या भूमिकेत राहणार आहे. याशिवाय 4 वेगवान गोलंदाज आणि एकच फिरकी गोलंदाज जॅक लीच या सामन्यात उतरणार आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.