ICC च्या गुगलीवर इंग्लंडचे प्रेक्षक क्लीन बोल्ड, कर्माचे धडे देणारा मेसेज व्हायरल

इंग्लंडच्या प्रेक्षकांनी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर शेरेबाजी केली होती.

News18 Lokmat | Updated On: Sep 10, 2019 12:39 PM IST

ICC च्या गुगलीवर इंग्लंडचे प्रेक्षक क्लीन बोल्ड, कर्माचे धडे देणारा मेसेज व्हायरल

मुंबई, 10 सप्टेंबर : ICC च्या सोशल मीडिया अकाउंटवरून अनेकदा मजेशीर रिप्लाय दिले जातात. आर्चरचं जुनं ट्विट असो किंवा वर्ल्ड कप, विम्बल्डन एकाचवेळी रंगलेला अंतिम सामना असो अनेकदा ट्विट करत फिरकी घेतली होती. आता अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियानं विजयी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियानं 18 वर्षांनी इंग्लंडमध्ये अॅशेस स्वत:कडे ठेवण्याचा पराक्रम केला आहे. संपूर्ण अॅशेस मालिका ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथनं गाजवली.

बंदीनंतर स्टीव्ह स्मिथ आणि वॉर्नर यांनी वर्ल्ड कपमध्येही जबरदस्त कामगिरी केली होती. वॉर्नर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये वरच्या स्थानावर होता. स्मिथनं अॅशेस मालिकेत तीन शतकं आणि दोन अर्धशतकं केली आहेत. स्मिथनं 5 डावात 134 पेक्षा जास्त सरासरीनं 671 धावा केल्या आहेत. स्मिथनं मँचेस्टरमध्ये द्विशतकही केलं. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं इंग्लंडवर चौथ्या कसोटीत विजय मिळवून अॅशेसवरही कब्जा केला.

दरम्यान, स्मिथ आणि वॉर्नर यांना इंग्लंडमध्ये प्रेक्षकांच्या शेरेबाजीला सामोरं जावं लागलं होतं. चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर पुनरागमन करत जबरदस्त कामगिरी केली. तरीही त्यांना प्रेक्षकांनी लक्ष्य केलं होतं. वॉर्नरला खिशात सँड पेपर तर नाही ना असा प्रश्न विचारला होता. तर स्मिथच्या चेहऱ्याचे मुखवटे घालून इंग्लंडच्या प्रेक्षकांनी डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही शेरेबाजीनं खचून न जाता स्मिथनं त्याचा खेळ केला.

Loading...

इंग्लंडच्या प्रेक्षकांनी केलेल्या शेरेबाजीवर आता आयसीसीनं ट्विट केलं आहे. प्रेक्षकांनी शेरेबाजी केली तरी त्यांचा हेतू साध्य झाला नाही. ऑस्ट्रेलियानंच अॅशेस जिंकली. त्यामुळं इंग्लंडच्या प्रेक्षकांची निराशाच झाली.

आयसीसीनं ट्विटरवर इंग्लंडच्या प्रेक्षकांनी स्मिथचा मुखवटा घातलेला फोटो शेअर करत कर्म म्हणजे काय हे सांगितलं आहे.

आयसीसीच्या या ट्विटनंतर अनेकांनी हे खरंच अधिकृत अकाउंट आहे का असं विचारलं आहे.

यापेक्षा चांगलं ट्रोलिंग होऊच शकत नाही असंही क्रिकेट चाहत्यांनी म्हटलं आहे.

VIDEO: ऐक्य असावं तर असं! गणपती आणि मोहरम पीर यांची एकत्र मिरवणूक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2019 12:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...