मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

बीस साल बाद! ऑस्ट्रेलियाच्या मानगुटीवर इडन गार्डनचं भूत, तेव्हा Dravid-Laxman, तर आता...

बीस साल बाद! ऑस्ट्रेलियाच्या मानगुटीवर इडन गार्डनचं भूत, तेव्हा Dravid-Laxman, तर आता...

ऑस्ट्रेलियाच्या मानगुटीवर 20 वर्षानंतर पुन्हा एकदा इडन गार्डनचं भूत बसलं आहे. ऍशेसच्या (Ashes Series)पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडने (Australia vs England 1st Test) धमाकेदार पुनरागमन केलं आहे.

  • Published by:  Shreyas

ब्रिस्बेन, 10 नोव्हेंबर : ऑस्ट्रेलियाच्या मानगुटीवर 20 वर्षानंतर पुन्हा एकदा इडन गार्डनचं भूत बसलं आहे. ऍशेसच्या (Ashes Series)पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडने (Australia vs England 1st Test) धमाकेदार पुनरागमन केलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा स्कोअर 220/2 एवढा झाला आहे. कर्णधार जो रूट (Joe Root) 86 रनवर आणि डेव्हिड मलान (David Malan) 80 रनवर नाबाद खेळत आहे. या सामन्यात इंग्लंड अजूनही 58 रनने पिछाडीवर आहे.

या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर इंग्लंडने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, पण त्यांचा फक्त 147 रनवर ऑल आऊट झाला. कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, तर स्टार्क आणि हेजलवूडला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. यानंतर बॅटिंगला आलेल्या ऑस्ट्रेलियाने तब्बल 425 रनचा डोंगर उभारला, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 278 रनची आघाडी मिळाली. ट्रॅव्हिस हेडने 152 रनची खेळी केली, तर डेव्हिड वॉर्नरने 94 आणि लाबुशेनने 74 रन केले.

ऑस्ट्रेलियाने सामन्यात एवढं पिछाडीवर टाकल्यानंतरही इंग्लंडने झुंज सोडली नाही. मॅचच्या तिसऱ्या दिवशी रूट आणि मलान यांनी टिच्चून बॅटिंग केली. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियासमो 2001 च्या कटू आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. 20 वर्षांपूर्वी कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात ऑस्ट्रेलियाची अवस्था अशीच होती, पण द्रविड आणि लक्ष्मणच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या तोंडातून विजयाचा घास हिसकावून घेतला. यावेळी रूट-मलानची जोडी द्रविड-लक्ष्मणच्या इतिहासाची पुनरावृत्ती करतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इडन गार्डनमध्ये ऐतिहासिक कामगिरी

11 मार्च ते 15 मार्च 2001 ला कोलकात्यामध्ये झालेल्या या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिले टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांनी 445 रन केले. कर्णधार स्टीव्ह वॉने (Steve Waugh) 110 रनची शतकी खेळी केली, तर मॅथ्यू हेडन (Mathew Hayden) 97 रनवर आऊट झाला. यानंतर बॅटिंगला आलेल्या भारताचा फक्त 171 रनवर ऑलआऊट झाला, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलोऑन दिला. 274 रनने पिछाडीवर पडल्यानंतर भारताने ऐतिहासिक पुनरागमन करत आपली इनिंग 657/7 वर घोषित केली. व्हीव्हीएस लक्ष्मणने (VVS Laxman) 281 तर राहुल द्रविडने (Rahul Dravid) 180 रनची खेळी केली. या दोघांमध्ये 376 रनची मॅरेथॉन पार्टनरशीप झाली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 384 रनचं आव्हान मिळालं, याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा 212 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे भारताचा 171 रनने विजय झाला.

First published:

Tags: Ashes, Australia, England