मुंबई, 28 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा (Australia vs England) मेलबर्नमध्ये झालेल्या ऍशेसच्या (Ashes Series) तिसऱ्या टेस्टमध्ये इनिंग आणि 14 रननी पराभव केला, याचसह ऑस्ट्रेलियाने ऍशेस सीरिजही आपल्या नावावर केली. इंग्लंडची संपूर्ण टीम फक्त 68 रनवर ऑल आऊट झाली. इंग्लंडचा 1936 नंतरचा ऍशेसमधला हा निच्चांकी स्कोअर आहे. ऑस्ट्रेलियाने या ऍशेसमध्ये 3-0 ची विजयी आघाडी घेतली. इंग्लंडचा या वर्षातला टेस्टमधला हा 9 वा पराभव आहे. एका वर्षात सर्वाधिक टेस्ट गमावण्याच्या बांगलादेशच्या विक्रमाची इंग्लंडने बरोबरी केली आहे. बांगलादेशने 2003 साली एका वर्षात 9 टेस्ट गमावल्या होत्या. तसंच क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडने एका वर्षात इतक्या टेस्ट गमावल्या आहेत.
ऍशेस सीरिजच्या तिसऱ्या टेस्टमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडच्या टीमवर चौफेर टीका करण्यात येत आहे. इंग्लंडचेच माजी क्रिकेटपटू जो रूटच्या कॅप्टन्सीवर टीका करत आहेत. त्यातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने (Wasim Jaffer) इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनवर (Michael Vaughan) निशाणा साधला आहे. मायकल वॉनने दोन वर्षांपूर्वी भारतीय टीमबाबत एक ट्वीट केलं होतं. जाफरने वॉनला याच ट्वीटची आठवण करून दिली आहे.
जाफरने एक व्हिडिओ ट्वीट करत मायकल वॉनला टॅग केलं आहे. मायकल वॉननेही जाफरच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया दिली आहे. वेरी गूड वसीम, असं वॉन म्हणाला आहे.
England 68 all out @MichaelVaughan 🙈 #Ashes pic.twitter.com/lctSBLOsZK
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 28, 2021
मेलबर्न टेस्टच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर स्कॉट बोलँडने इंग्लंडच्या बॅटिंगवर घाव घातला. त्याने 21 बॉलमध्येच 6 विकेट मिळवल्या. इंग्लंडने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 31 रनवर सुरू केली, पण एकही खेळाडू मैदानात टिकू शकला नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये जो रूटने (Joe Root) सर्वाधिक 28 रन केल्या. रूटने पहिल्या इनिंगमध्येही 50 रन केले होते. इंग्लंडने दुसऱ्या इनिंगमध्ये 8 रनमध्येच 5 विकेट गमावल्या, त्यांचे 4 खेळाडू शून्य रनवर आऊट झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashes