Home /News /sport /

IPL मध्ये 14 कोटी कमावले, तरी क्रिकेटपटूवर फाटके बूट घालून खेळायची वेळ!

IPL मध्ये 14 कोटी कमावले, तरी क्रिकेटपटूवर फाटके बूट घालून खेळायची वेळ!

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या (Australia vs England) दुसऱ्या टेस्टवरची (Ashes Series) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया त्यांचे महत्त्वाचे फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि जॉश हेजलवूडशिवाय (Josh Hazlewood) मैदानात उतरली आहे.

पुढे वाचा ...
    ऍडलेड, 18 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या (Australia vs England) दुसऱ्या टेस्टवरची (Ashes Series) आपली पकड आणखी मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या इनिंगचा स्कोअर 45 रनवर 1 विकेट असा आहे, त्यामुळे त्यांची आघाडी 282 रनपर्यंत पोहोचली आहे. त्याआधी तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा 236 रनवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 473 रन केले, म्हणजेच कांगारूंना पहिल्या इनिंगमध्ये 237 रनची आघाडी मिळाली. या सामन्याचे अजून 2 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे इंग्लंडला मॅच वाचवणं सोपं असणार नाही. या सामन्यात ऑस्ट्रेलिया त्यांचे महत्त्वाचे फास्ट बॉलर पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि जॉश हेजलवूडशिवाय (Josh Hazlewood) मैदानात उतरली आहे. या दोघांच्या गैरहजेरीत मायकल नेसर (Michael Neser) आणि झाय रिचर्डसन (Jhye Richardson) यांना खेळण्याची संधी मिळाली आहे. मायकल नेसरची ही पहिलीच टेस्ट आहे, तर झाय रिचर्डसन अडीच वर्षांनंतर टेस्ट खेळत आहे, त्यामुळे दोघांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. पण ऍडलेड टेस्टमध्ये रिचर्डसन बॉलिंगपेक्षा त्याच्या फाटक्या बूटमुळे जास्त चर्चेत आला आहे. तिसऱ्या दिवशी रिचर्डसनने फाटका बूट घालून बॉलिंग केली. याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये बॉलिंग करताना रिचर्डसनच्या पायाच्या अंगठा बुटाबाहेर येत असल्याचं दिसत आहे. रिचर्डसनने फाटलेल्या बुटावर टेप लावलेलीदेखील फोटोमध्ये दिसत आहे. या सामन्यात रिचर्डसनला फार यश मिळालं नाही. 19 ओव्हरमध्ये त्याने 78 रन देऊन फक्त एक विकेट घेतली. काही फास्ट बॉलर मुद्दाम पुढच्या पायाच्या बुटाला भोक पाडतात, कारण बॉलिंग करताना पुढचा पाय योग्य ठेवायला मदत होते. या कारणामुळे रिचर्डसनने बूट फाडला असेल, असा अंदाजही काहींनी व्यक्त केला. रिचर्डसनला आयपीएलच्या मागच्या लिलावात (IPL Auction) पंजाब किंग्सनी (Punjab Kings) 14 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, पण रिचर्डसनची कामगिरी निराशाजनक झाली. संपूर्ण मोसमात त्यान 3 मॅच खेळल्या, यात त्याला फक्त 3 विकेट मिळाल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या