नवी दिल्ली, 19 डिसेंबर: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (australia vs england) या दोन्ही संघामध्ये अॅशेस सीरिज(ashes series) खेळवण्यात येत आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने बाजी मारत 9 गडी राखून विजय मिळवला. तर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया संघ विजयाच्या अगदी जवळ आहे. दरम्यान मिचेल स्टार्कने (Mitchel Starc)मोठा खुलासा केला आहे.
मिचेल स्टार्कने ( Mitchel Starc) अॅशेस सीरिज दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. पहिल्या डावात त्याने 4 गडी बाद केले होते. तिसऱ्या दिवसाचा (18 डिसेंबर) खेळ संपल्यानंतर मिचेल स्टार्कने सांगितले की, “आम्ही डिनरसाठी गेलो असता पॅट कमिन्स कोरोना संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता. मी आणि नॅथन लायन देखील तिथे गेलो होतो. परंतु त्याने माझा मेसेज पाहीला नव्हता, ज्यामुळे आम्ही बाहेरच होतो. बाहेर बसून आम्ही भाग्यशाली ठरलो.
हॉटेलमध्ये आल्यानंतर पॅट कमिन्सला कोरोना संक्रमणाची चिंता होती. ज्यामुळे लायन देखील झोपला नव्हता.”
कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे पॅट कमिन्स दुसऱ्या टेस्ट मॅचमधून बाहेर झाला आहे. तर मिचेल स्टार्क आणि नाथन लायन एका मेसेजमुळे बचावले आहेत.
दुसऱ्या टेस्ट मॅचमधील पहिल्या डावात मिचेल स्टार्कने 4 गडी बाद केले होते. तर लायनने 3 गडी बाद केले. दोघांनी मिळून 7 गडी बाद केले होते. जर चुकून कमिन्सने तो मेसेज पाहिला असता तर या दोन्ही खेळाडूंना दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळता आले नसते. सध्या ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashes, Cricket news