मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'मोबाईल फोन आणि ती 40 मिनीटं, थोडक्यात बचावले स्टार्क-लायन', कमिन्सचा खुलासा

'मोबाईल फोन आणि ती 40 मिनीटं, थोडक्यात बचावले स्टार्क-लायन', कमिन्सचा खुलासा

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याचं इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या ऍशेस टेस्टमध्ये (Ashes 2021-22) पुनरागमन झालं आहे. कोरोनामुळे कमिन्स दुसऱ्या टेस्टमध्ये खेळू शकला नव्हता.

मेलबर्न, 25 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याचं इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या ऍशेस टेस्टमध्ये (Ashes 2021-22) पुनरागमन झालं आहे. कोरोनामुळे कमिन्स दुसऱ्या टेस्टमध्ये खेळू शकला नव्हता, त्याच्याऐवजी स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) टेस्ट टीमचं नेतृत्व देण्यात आलं होतं. 40 मिनीटं फोन न बघितल्यामुळे फास्ट बॉलर मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि नॅथन लायन (Nathan Lyon) वाचले, असा खुलासा कमिन्सने केला आहे. पॅट कमिन्सला कोरोना झाला नव्हता, पण तो कोरनाग्रस्ताच्या संपर्कात आला होता, त्यामुळे त्याला दुसरी टेस्ट खेळता आली नाही. स्टार्क आणि लायन आपल्यासोबत डिनर करणार होते, पण मी फोन बघितला नाही आणि मग त्या दोघांनी दुसरीकडे जाऊन जेवण केलं, असं कमिन्स म्हणाला.

डिनरसाठी बाहेर पडणं मला महागात पडलं, कारण मी कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आलो आणि मला दुसरी टेस्ट खेळता आली नाही, ज्यामुळे मला राग आला, असं वक्तव्य कमिन्सने केलं.

कमिन्स दुसऱ्या टेस्टआधी त्याचा मित्र हॅरी कॉनवेसोबत ऍडलेडच्या हॉटेलमध्ये डिनरसाठी गेला होता. कॉनवे बिग बॅश लीगमध्ये ऍडलेड स्ट्रायकर्सकडून खेळतो. त्यांच्याजवळ बसलेला एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं.

द वेस्ट ऑस्ट्रेलिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना कमिन्स म्हणाला की याबाबत कोणालाही दोष देता येणार नाही. कमिन्सची आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह आली होती, पण साऊथ ऑस्ट्रेलियाच्या कोरोना नियमांमुळे त्याला क्वारंटाईन व्हावं लागलं आणि त्याला ऍडलेड टेस्ट खेळता आली नाही.

कमिन्सचे सहकारी मिचेल स्टार्क आणि लायनही दुसऱ्या टेस्टमधून बाहेर झाले असते, कारण ते दोघंही त्याच हॉटेलमध्ये डिनर करणार होते. पण कमिन्सने फोन 40 मिनीटं बघितला नाही, अखेर लायन आणि स्टार्क दुसऱ्या हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले.

First published:
top videos

    Tags: Ashes, Australia