Ashes : ऑस्ट्रेलियाची नवी परंपरा इंग्लंडने मोडली, कर्णधार आणि प्रशिक्षक नाराज

Ashes : ऑस्ट्रेलियाची नवी परंपरा इंग्लंडने मोडली, कर्णधार आणि प्रशिक्षक नाराज

अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टिम पेननं सुरू केलेली नव्या परंपरेबद्दल इंग्लंडचा कर्णधार जो रूटनं नाराजी व्यक्त केली आहे.

  • Share this:

बर्मिंगहॅम, 02 ऑगस्ट : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून अॅशेस मालिकेला सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 284 धावा केल्या. दरम्यान सामन्यापूर्वी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानं एक परंपरा मोडल्यानं त्याची जोरदार चर्चा होत आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार टिम पेन यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंशी सामन्यापूर्वी हस्तांदोलन करण्याची परंपरा सुरू केली होती. मात्र, गुरुवारी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी हस्तांदोलन केलं नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मालिकेत डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, कॅमरन बेनक्राफ्ट यांच्यावर चेंडू छेडछाडीचा आरोप झाला होता. त्यानंतर या खेळाडूंवर बंदीची कारवाई करण्यात आली होती. या बंदीनंतर संघाची प्रतिमा सुधारण्यासाठी कर्णधार टिम पेननं प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याची परंपरा सुरू केली. फूटबॉल प्रमाणे क्रिकेटमध्येही सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडू हस्तांदोलन करतात.

ऑस्ट्रेलियाच्या नव्या परंपरेवर इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट आणि प्रशिक्षक ट्रेव्ह बेलिस यांनी मात्र नाराजी व्यक्त केली. एजबस्टनमध्ये पहिल्या कसोटीपुर्वी या दोघांनी मॅच रेफरींना याबद्दल सांगितंल होतं. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मागच्या एकदिवसीय मालिकेवेळी वनडे कर्णधार इयॉन मॉर्गननं हस्तांदोलन करणाऱ्या परंपरेचं समर्थन केलं होतं. मात्र अॅशेस मालिकेत मात्र ही परंपरा कायम ठेवण्यात आली नाही.

Ashes : अत्तराच्या बाटलीत राख असेलली प्रतिष्ठेची ट्रॉफी, जाणून घ्या रंजक इतिहास

अॅशेसमध्ये आतापर्यंत 71 मालिका झाल्या. यात 33 वेळा ऑस्ट्रेलियानं तर 32 वेळा इंग्लंडनं विजय मिळवला आहे. गेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियात इंग्लंडला 4-0 ने पराभूत व्हावं लागलं होतं. तरीही ऑस्ट्रेलियासाठी ही मालिका यावेळी कठीण असेल. त्यांना गेल्या 18 वर्षात इंग्लंडमध्ये अॅशेस जिंकता आलेली नाही.

प्रेक्षकांनी रडवलं पण त्यानं जिंकलं मैदान, सचिन-विराटलाही टाकलं मागे

Ashes : कसोटीच्या पहिल्याच दिवशी पंचांचे 7 निर्णय चुकले!

'SUPER 30'चा पार्ट 2: 75 दुणे...अचूक पाढे म्हणाऱ्या'सुपर आजी',एकदा VIDEO पाहाच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 02:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading