क्रिकेटमधील 'डॉन'चा 89 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडणार का? ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा!

क्रिकेटमधील 'डॉन'चा 89 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडणार का? ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा!

अॅशेस मालिकेतील पाचव्या (England vs Australia, 5th Test)आणि अखेरच्या कसोटीत स्मिथ मैदानात उतरेल तेव्हा त्याला एका महान क्रिकेटपटूचा विक्रम मोडण्याची संधी असेल.

  • Share this:

लंडन, 11 सप्टेंबर: यंदाच्या अॅशेस (Ashes 2019)मालिका कोणी गाजवली असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर म्हणून केवळ एकाच खेळाडूचे नाव समोर येईल आणि ते नाव म्हणजे स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) होय. विश्वविजेत्या इंग्लंड संघ आणि अॅशेस कप यांच्यात सर्वात मोठा अडथळा ठरला स्टीव्ह स्मिथ होय. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या अॅशेस मालिकेत आतापर्यंत 4 सामने झाले आहेत आणि त्यापैकी 3 सामन्यात स्मिथ खेळला आहे. या तीन सामन्यात त्याने 3 शतके आणि दोन अर्धशतकांसह 671 धावांचा डोंगर उभा केला आहे. दुसऱ्या कसोटीत मानेवर चेंडू लागल्याने स्मिथ जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तिसऱ्या कसोटीला मुकावे लागले होते. आता मालिकेतील पाचव्या (England vs Australia, 5th Test)आणि अखेरच्या कसोटीत स्मिथ मैदानात उतरेल तेव्हा त्याला एका महान क्रिकेटपटूचा विक्रम मोडण्याची संधी असेल.

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (England vs Australia) यांच्यात 1882पासून सुरु असलेल्या या कसोटी मालिकेच्या इतिहासात महान क्रिकेटपटू सर डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. ब्रॅडमन यांनी 5 सामन्यांच्या एका मालिकेत सर्वाधिक म्हणजे 974 धावा केल्या होत्या. त्यांनी हा विक्रम 89 वर्षांपूर्वी म्हणजे म्हणजे 1928-29च्या मालिकेत केला होता. तेव्हा ब्रॅडमन यांनी एक त्रिशतक, दोन द्विशतक आणि एक शतकी खेळी केली होती. तेव्हा मालिकेत ब्रॅडमन यांचा दबदबा होता. त्यांनी मालिकेत 8, 131, 254,1,334,14 आणि 232 धावा केल्या होत्या. ब्रॅडमन यांनी उभा केलेला हा धावांचा डोंगर केवळ अॅशेसच नाही तर कोणत्याही कसोटी मालिकेच्या इतिहासातील सर्वोच्च धावा आहेत. या क्रमवारीत इंग्लंडचे वॉल्टर हेमंड दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांनी 1928-29च्या मालिकेत 905 धावा केल्या होत्या.

आता यंदाच्या मालिकेत स्मिथने तीन सामन्यातील 5 डावात 611 धावा केल्या आहेत. यात 3 शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. स्मिथच्या या खेळीत 211 धावांची सर्वोच्च खेळी केली आहे. तर 82 हा त्याचा सर्वात कमी स्कोअर आहे. पहिल्या कसोटीत स्मिथने 144 आणि 142, दुसऱ्या कसोटीत 92 आणि चौथ्या कसोटीत 211 आणि 82 धावा केल्या आहेत. तिसऱ्या कसोटीत स्मिथ जखमी झाल्याने तो खेळू शकला नव्हता. योगायोग म्हणजे याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का बसला होता. विशेष म्हणजे तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा केवळ एका विकेटने पराभव झाला होता.

आता ब्रॅडमन यांचा विक्रम मोडण्यासाठी स्मिथला पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत 304 धावांची गरज आहे. एका कसोटीत 304 धावा करणे हे अवघड आहे. पण स्मिथ ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे ते पाहता हा विक्रम तो मोडू शकतो असे म्हटले जात आहे. सर डॉन ब्रॅडमन सारख्या महान खेळाडूचा विक्रम मोडण्याची संधी स्मिथकडे आहे. त्यामुळेच पाचव्या कसोटीत सर्वांची नजर असणार आहे ती फक्त आणि फक्त स्टीव्ह स्मिथ याच्यावर...

उद्धव ठाकरेंचं युतीबद्दल सूचक विधान, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 08:32 PM IST

ताज्या बातम्या