Ashes : स्मिथनं इंग्लंडला रडवलं, डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज

ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने एकाच कसोटीत दोन शतकं केली आहेत. याआधी मॅथ्यू हेडनने अॅशेस मालिकेत 2002 मध्ये अशी कामगिरी केली होती.

News18 Lokmat | Updated On: Aug 4, 2019 08:45 PM IST

Ashes : स्मिथनं इंग्लंडला रडवलं, डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने 16 महिन्यांनी कसोटीत पुनरागमन केलं. अॅशेस मालिकेतील पहिल्याच कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने दोन्ही डावात शतक केलं आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने 2002 मध्ये दोन्ही डावात शतक केलं होतं. आतापर्यंत पाच ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे.

चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथला अनेकवेळा स्टेडियममध्ये डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. कसोटीच्या पहिल्या दिवशीसुद्धा इंग्लंडच्या प्रेक्षकांनी स्मिथ रडत असलेल्या चेहऱ्याचा फोटो असलेले मास्क लावले होते.

स्मिथने प्रेक्षकांनी केलेल्या हूटिंगने विचलीत न होता दोन्ही डावात शतक झळकावलं. त्याची कसोटीत 25 तर अॅशेसमध्ये 10 शतकं झाली आहेत. फक्त 2 खेळाडू स्मिथच्या पुढे आहेत. यात डॉन ब्रॅडमन 19, जॅक हॉब्सच्या नावावर 12  शतकं आहेत.

कसोटीत 119 डावांत 25 शतकं करण्याची कामगिरी स्मिथने केली आहे. याबाबतीत त्यानं सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला मागे टाकलं आहे. सचिनने 130 डावात तर विराटने 127 डावात 25 शतकं केली होती.

सर्वात वेगवान 25 शतकं करण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी फक्त 68 डावात ही कामगिरी केली होती.

ससर्वात वेगवान 25 शतकं करण्याचा विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. त्यांनी फक्त 68 डावात ही कामगिरी केली होती.

Loading...

स्मिथच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 284 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं 122 धावांत 8 विकेट गमावल्या होत्या. त्यावेळी स्मिथने डाव सावरला आणि ऑस्ट्रेलियाला 284 धावांवर पोहचवलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 4, 2019 08:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...