अरेच्चा! बेल्सशिवाय खेळला गेला क्रिकेटचा सामना, पहिल्यांदाच लागू झाला ICCचा 'हा' नियम

अरेच्चा! बेल्सशिवाय खेळला गेला क्रिकेटचा सामना, पहिल्यांदाच लागू झाला ICCचा 'हा' नियम

अॅशेस मालिकेत चौथ्या कसोटी सामन्यात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला.

  • Share this:

मॅंचेस्टर, 05 सप्टेंबर : अॅशेस मालिकेत चौथ्या कसोटी सामन्यात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. यावेळी पहिल्या दिवशीचा सामना एका वेगळाच नियमानं खेळला गेला. मॅंचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात पहिल्या दिवशी बेल्सशिवाय सामना खेळला गेला. असा प्रकार क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला आहे. याचे कारण मात्र काही वेगळेत आहे.

या सामन्यात टॉस जिंकत ऑस्ट्रेलियानं प्रथम फलंदाजी करण्यात निर्णय घेतला. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करणे कठिण झाले होते. त्यातच 32व्या ओव्हरमध्ये तेज गतीनं हवा येण्यास सुरुवात झाली. हवेचा जोर एवढा होता की, बेल्स स्टम्पसवर राहत नव्हत्या, हवेमुळं त्या सतत खाली पडत होत्या. यावेळी पंचांनी आयसीसीच्या एका नव्या नियमाचा वापर केला.

पंचांनी घेतला बेल्स काढण्याचा निर्णय

चालू सामन्यात तेज गतीनं येणाऱ्या हवेमुळं प्लास्टिक बॅग आणि बॉलही मैदानावर आले. त्यामुळं स्टम्पसवर बेल्स राहत नसल्याचे पाहून पंच कुमार धर्मसेना आणि मराएस एरासमस यांनी आपापसात चर्चा करत सामना काही काळ बेल्सशिवाय खेळण्याचा निर्णय घेतला.

वाचा-जमिनीवर पडला पण थांबला नाही! स्मिथच्या अजब स्टाईलनं प्रेक्षकही चक्रावले

इंग्लंडच्या कर्णधारानं व्यक्त केली नाराजी

इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि गोलंदाद ब्रॉड यानं पंचांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी पंचांना बेल्ससोबत खेळण्यात सांगितले. मात्र पंचांचा निर्णय हा आयसीसीच्या नियमाशी बांधिल असल्यामुळं बेल्स काढून सामना खेळवण्यात आला.

काय आहे आयसीसीचा नियम

आयसीसीचा नियम 8.5 नुसार, जर गरज असेल तर पंच आपापसात चर्चा करून बेल्स हटवण्याचा निर्णय घेऊ शकतात. जर पंच बेल्स हटवण्यासाठी तयार असतील तर दोन्ही विकेट जवळच्या बेल्स हटवणे बंधनकारक आहे. तसेच, जेव्हा बेल्स ठेवण्यासाठी परिस्थिती अनुकुल असेल तेव्हा पंच बेल्स ठेवू शकतात.

वाचा-भारत आणि पाकिस्तान यांच्यात कांटे की टक्कर! 'या' तारखेला होणार महामुकाबला

स्थिथचा अजब शॉट

अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशीचा खेळ पावसात वाया गेला. तरी, चाहत्यांना स्टिव्ह स्मिथची तुफान फलंदाजी पाहायला मिळाली. दुसऱ्या कसोटी सामन्यात जखमी झाल्यानंतर स्मिथनं पुनरागमन केले. दरम्यान या सामन्यात स्मिथनं पुन्हा एकदा जगातला नंबर 1 फलंदाज का आहे, हे सिद्ध केले. पहिल्या दिवसाचा खेळ समाप्त झाला तेव्हा स्मिथ 60 धावांवर होता. दरम्यान ऑस्ट्रेलियानं 28 धावांवरच दोन विकेट गमावल्या. यावेळी स्मिथनं लाबुशेनसोबत 116 धावांची शतकी भागीदारी केली. मात्र या सामन्यात सर्वांचे लक्ष वेधले ते स्मिथच्या एक शॉटनं. स्टिव्ह स्मिथची फलंदाजी जगातील इतर फलंदाजांपेक्षा खुप वेगळी आहे. याचमुळे त्याच्या खेळामध्ये त्यानं मारलेल्या शॉट्सच्या चर्चा जास्त रंगतात. स्टिव्ह स्मिथनं मॅंचेस्टरमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात एक अजब शॉट मारला. हा शॉट मारतचं स्मिथनं आपले अर्धशतक पूर्ण केले, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वाचा-गुरु-शिष्याची हिट जोडी! 'या' शिक्षकांमुळे देशाला मिळाले सचिन, धोनी आणि विराट

स्मिथचा जबरदस्त फॉर्म

स्मिथनं अॅशेस मालिकेत शानदार कामगिरी केली आहे. या मालिकेत त्यानं आतापर्यंत 2 शतक आणि 2 अर्धशतक लगावले आहे. स्मिथ सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाज आहे. स्मिथनं 4 सामन्यात 400चा आकडा पार केला आहे. या मालिकेत स्मिथनं सलग 8वेळा 50हून अधिक धावा केल्या आहेत. तर, पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकी कामगिरी केली. गेल्या 8 कसोटी सामन्यात फक्त इंग्लंड विरोधात 130हून अधिकच्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यामुळं मॅंचेस्टरमध्येही स्मिथचे वादळ दिसणार अशी शक्यता आहे.

वाचा-‘ए गणपत चल दारू ला’, त्या एका ट्विटवरून रवी शास्त्री पुन्हा झाले ट्रोल!

VIDEO : रस्त्यावर चालताना मोकाट वळूने महिलेला उचलून फेकलं, लोकांची धावपळ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 5, 2019 03:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading