मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

सराव करताना 12 वर्षीय मुलीच्या खांद्यात घुसला बाण, तशाच अवस्थेत केला आसाम ते दिल्ली प्रवास

सराव करताना 12 वर्षीय मुलीच्या खांद्यात घुसला बाण, तशाच अवस्थेत केला आसाम ते दिल्ली प्रवास

खेलो इंडियाच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी आसामची 12 वर्षीय तिरंदाज शिवांगी गोहेनचा सरावावेळी विचित्र अपघात झाला आहे.

  • Published by:  Suraj Yadav
डिब्रूगढ, 10 जानेवारी : खेलो इंडियाच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी आसामची 12 वर्षीय तिरंदाज शिवांगी गोहेनचा सरावावेळी विचित्र अपघात झाला आहे. भारताच्या खेळ प्राधिकरणाच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सराव करत असताना शिवांगीच्या खांद्यात बाण घुसला आहे. यानंतर तिला एअरलिफ्ट करून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सराव करत असताना शिवांगीला बाण लागला आहे. त्याच अवस्थेत तिला डिब्रूगढ इथून दिल्लीला आणण्यात आलं. या ठिकाणी तिच्यावर सर्जरी होणार आहे. याबाबत आसाम तिरंदाजी संघाचे सचिव नवज्योती बासुमतारी यांनी सांगितलं की, 'ही दुर्दैवी घटना साई इथल्या छाबुआ केंद्रामध्ये झाली.' शिवांगी 9 वर्षांपासून तिरंदाजी शिकत आहे. अनेक स्पर्धांमध्ये तिने विजेतेपद पटकावलं आहे. नुकत्याच झालेल्या स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या 65 व्या नॅशनल स्कूल गेम्स आर्चरी चॅम्पियनशिपमध्येही भाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन आंध्र प्रदेशातील कपाडा इथं झालं होतं. आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी शिवांगी गोहेनला सर्व ती मदत दिली जाईल असं आश्वासन दिलं आहे. शिवांगीचे वडिल बिरिंची गोहेन यांनी सांगितले की, शिवांगीवर दिल्लीतील एम्समध्ये उपचार करण्यात येणार आहेत. ती लवकर ठिक व्हावी यासाठी प्रार्थना करत आहे. एक्सरे रिपोर्टमध्ये बाण शिवांगीच्या स्पायनल कॉर्डपर्यंत पोहचल्याचं दिसलं. त्यानंतरच तिच्यावर दिल्लीत उपचार कऱण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘वर्ल्ड कप जिंकल्यानंतरच घेणार निवृत्ती’, रोहित शर्माचा गौप्यस्फोट!
First published:

पुढील बातम्या