S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

अंधत्वावर मात करत डोंबिवलीच्या आर्यनची वर्ल्ड चेस ओलमपियाडसाठी निवड

डोंबिवलीमधील चंद्रकांत पाटकर शाळेत शिकणाऱ्या आर्यन जोशी ( वय 15) याची वर्ल्ड चेस ओलमपियाड 2017 साठी निवड झाली आहे.

Sachin Salve | Updated On: May 8, 2017 08:50 PM IST

अंधत्वावर मात करत डोंबिवलीच्या आर्यनची वर्ल्ड चेस ओलमपियाडसाठी निवड

प्रदीप भणगे, डोंबिवली

08 मे : डोंबिवलीमधील चंद्रकांत पाटकर शाळेत शिकणाऱ्या आर्यन जोशी ( वय 15) याची वर्ल्ड चेस ओलमपियाड 2017 साठी निवड झाली आहे.

आर्यन स्वतः अंध विद्यार्थी असून त्याला दोन्ही डोळ्याने उजेडात दिसत नाही तर रात्री थोडे फार प्रमाणात दिसते. आपल्या अंधत्वावर मात करत आर्यन एक पाऊल पुढे टाकले आहे आणि आपल्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या बळावर त्याची निवड झाली असून भारतामधील 5 जण ह्या चेस कॉपीटिशन खेळण्यासाठी जाणार आहेत.त्यामध्ये डोंबिवलीकर आर्यन जोशी सुद्धा भाग घेणार आहे. या स्पर्धेला वय मर्यादा नसून आर्यन सर्वात कमी वयाचा आहे. 5 खेळाडू पैकी 2 खेळाडू आपल्या महाराष्ट्र मधील असून त्याची एक आर्यन आहे. या वर्ल्ड चेस ओलमपियाड 2017 मध्ये जगातील 30 ते 40 देश सहभागी होणार आहे.

'15th IBCA chess olympiyad for blind and visually impaired chess players 2017'  असे नाव ह्या स्पर्धेचे आहे. ही स्पर्धा जून 17 ते 29 दरम्यान होणार असून मॅसिडोना या देशात होणार आहे.

ह्या पूर्वी आर्यन अनेक चेस स्पर्धा जिंकल्या असून मार्च महिन्यात झालेल्या आशियाई चेस स्पर्धेत तो चौथा आला होता. आर्यनला संगणक आणि स्विमिंगची आवड असून नॅशनल अंडर 15  ब्लाइन्ड स्विमिंग स्पर्धेमध्ये 4 पदक मिळवली आहेत.

आर्यनला डोळ्याने दिसत नसले तरी त्यानी इतर अंध आणि अपंग मुलांना संदेश दिला आहे की तुमच्याकडे काही कमी आहे समजू नका मेहनत करा म्हणजे यश नक्की मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 8, 2017 08:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close