अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताची सुवर्ण झेप

  • Share this:

vikas goda08 जुलै : विसाव्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये यजमान भारतानं दमदार कामगिरी करत स्पर्धेवर आपली छाप उमटवली. 2009 आणि 2011 च्या आशियाई स्पर्धेत भारताला फक्त एकाच गोल्ड मेडलवर समाधान मानावं लागलं होतं. पण यंदा भारतानं एक पाऊल पुढे टाकलंय. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारतानं दुसरं गोल्ड मेडल पटकावत स्पर्धेची सांगता गोल्डन कामगिरीनं केली.

महिलांच्या 4 x 400 रिले शर्यतीत भारतानं दमदार कामगिरी करत गोल्ड मेडल पटकावलं. याशिवाय स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी ट्रीपल जम्पमध्ये रंजित माहेश्वरी, अरपिंदर सिंग, महिलांच्या 200 मीटर शर्यतीत आशा रॉय दुत चंद, महिलांच्या 800 मीटरमध्ये टिंटू लूका, पुरुषांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत सतिंदर सिंग आणि उंच उडीत जीतिन थॉमसनं मेडलची लयलूट केली.

या स्पर्धेत भारतानं 2 गोल्ड मेडलसह तब्बल 17 मेडल पटकावत सहाव्या क्रमांकावर झेप घेतली. जपानमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतानं 1 गोल्ड मेडलसह 10 मेडलची कमाई केली होती. आणि 7 व्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. पण यंदा भारतानं गेल्या कामगिरीत आणखी 7 मेडलची भर टाकत एक क्रमांकाची आघाडी घेतली. चीननं 27 मेडलसह आशियाई स्पर्धेतलं आपलं अव्वल स्थान कायम राखलं.

भारताचे मेडल विजेते खेळाडू

विकास गौडा, प्रेम कुमार, सुधा सिंग, पुवम्मा एम आर, आशा रॉय, रणजित महेश्वरी, जीतिन थॉमस, समरजित सिंग, हेमाश्री जे

रतीराम सैनी, ओमप्रकाश कर्‍हाना, मयुखा जॉनी, सतिंदर सिंग, दूती चांद, टिंटू लूका आणि अरपिंदर सिंग

First published: July 8, 2013, 7:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading