BCCI ला 2 पदाधिकार्‍यांचा रामराम

नवी दिल्ली 31 मे : स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयला आज चांगलेच हादरे बसले. बीसीसआयचे खजिनदार अजय शिर्के आणि सचिव संजय जगदाळे यांचे राजीनामे दिले आहे. त्यांच्यापाठोपाठ बीसीसीआयचे आणखी पाच पदाधिकारी आज मध्यरात्री राजीनामा देतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय. पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिल्यामुळे श्रीनिवासन यांची खुर्ची आणखी धोक्यात आली आहे. येत्या 48 तासात बीसीसीआयची बैठक होईल आणि या बैठकीत श्रीनिवासन यांच्या फैसला होण्याची शक्यता आहे. आज सकाळीच अजय शिर्के यांनी बीसीसीआयसाठी आज सकाळी काम करण्याचं थांबवत असल्याचं जाहीर केलं होतं. बोर्डावर होत असलेल्या आरोपांमुळे, बीसीसीआयची प्रतिमा डागाळतेय, त्यामुळे काम करणं थांबवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.कोण आहेत अजय शिर्के- बीसीसीआयचे खजिनदार- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष- आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे सदस्यकोण आहेत सजंय जगदाळे- मध्यप्रदेशकडून रणजी प्रतिनिधीत्व- IPL चौकशी समिती सदस्य- भारतीय निवड समिती सदस्य- अनेक गुणवान खेळाडूंना संधी- नरेंद्र हिरवाणीला पहिली संधी - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, मुरली कार्तिक,- हृषीकेष कानिटकर, एस. श्रीराम. नमन ओझा आणि विपिन आचार्य यांना प्रकाशात आणलंश्रीनिवासन यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्यातबीसीसीआयमध्ये अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याविरोधी गट सक्रिय झालाय. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नाही तर तातडीची बैठक बोलावण्यात येईल असं सांगण्यात येतंय. सध्याच्या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला आणि अरुण जेटली यांच्या अनौपचारिक चर्चेला सुरुवात केली आहे. दुसरीकडे श्रीनिवासन यांना आणखी अडचणीत आणणारी घटना घडली. आयपीएलचे सीईओ सुंदर रामन यांनी गुरुनाथ मय्यप्पन, चेन्नई सुपर किंग्जचे मालक इंडिया सिमेंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली. तर मयप्पन याचा मित्र आणि हॉटेलचालक विक्रम अगरवाल याची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. अगरवाल हा विंदू दारा सिंग आणि मयप्पन यांच्यातला दुवा समजला जातो. श्रीनिवासन यांना बीसीसीआयमध्ये नेमका किती पाठिंबा ?बीसीसीआय एकूण मतं - 31- विरोधी गटएकूण विरोधक - 18मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल, पंजाब, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, बंगाल, नॅशनल क्रिकेट क्लब, विदर्भ, आसाम, महाराष्ट्र, सौराष्ट्र, रेल्वे, सेनादल, इंडियन युनिव्हर्सिटी, हैदराबादसमर्थक गटएकूण समर्थक - 6तामिळनाडू, त्रिपुरा, ओरिसा, केरळा, जम्मू-काश्मीर आणि श्रीनिवासन यांचं स्वत:चं मततळ्यात मळ्यातएकूण मतं - 7बडोदा, हरियाणा, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि झारखंड

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2013 02:19 PM IST

BCCI ला 2 पदाधिकार्‍यांचा रामराम

नवी दिल्ली 31 मे : स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयला आज चांगलेच हादरे बसले. बीसीसआयचे खजिनदार अजय शिर्के आणि सचिव संजय जगदाळे यांचे राजीनामे दिले आहे. त्यांच्यापाठोपाठ बीसीसीआयचे आणखी पाच पदाधिकारी आज मध्यरात्री राजीनामा देतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय. पदाधिकार्‍यांनी राजीनामा दिल्यामुळे श्रीनिवासन यांची खुर्ची आणखी धोक्यात आली आहे. येत्या 48 तासात बीसीसीआयची बैठक होईल आणि या बैठकीत श्रीनिवासन यांच्या फैसला होण्याची शक्यता आहे. आज सकाळीच अजय शिर्के यांनी बीसीसीआयसाठी आज सकाळी काम करण्याचं थांबवत असल्याचं जाहीर केलं होतं. बोर्डावर होत असलेल्या आरोपांमुळे, बीसीसीआयची प्रतिमा डागाळतेय, त्यामुळे काम करणं थांबवत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.कोण आहेत अजय शिर्के- बीसीसीआयचे खजिनदार- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष- आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे सदस्यकोण आहेत सजंय जगदाळे

- मध्यप्रदेशकडून रणजी प्रतिनिधीत्व- IPL चौकशी समिती सदस्य- भारतीय निवड समिती सदस्य- अनेक गुणवान खेळाडूंना संधी- नरेंद्र हिरवाणीला पहिली संधी - व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, मुरली कार्तिक,- हृषीकेष कानिटकर, एस. श्रीराम. नमन ओझा आणि विपिन आचार्य यांना प्रकाशात आणलं

श्रीनिवासन यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्यातबीसीसीआयमध्ये अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याविरोधी गट सक्रिय झालाय. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांनी राजीनामा दिला नाही तर तातडीची बैठक बोलावण्यात येईल असं सांगण्यात येतंय. सध्याच्या स्थितीतून मार्ग काढण्यासाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार, आयपीएल आयुक्त राजीव शुक्ला आणि अरुण जेटली यांच्या अनौपचारिक चर्चेला सुरुवात केली आहे. दुसरीकडे श्रीनिवासन यांना आणखी अडचणीत आणणारी घटना घडली. आयपीएलचे सीईओ सुंदर रामन यांनी गुरुनाथ मय्यप्पन, चेन्नई सुपर किंग्जचे मालक इंडिया सिमेंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्या विरोधात फौजदारी तक्रार दाखल केली. तर मयप्पन याचा मित्र आणि हॉटेलचालक विक्रम अगरवाल याची मुंबई पोलीस चौकशी करत आहेत. अगरवाल हा विंदू दारा सिंग आणि मयप्पन यांच्यातला दुवा समजला जातो.

श्रीनिवासन यांना बीसीसीआयमध्ये नेमका किती पाठिंबा ?

Loading...

बीसीसीआय एकूण मतं - 31

- विरोधी गटएकूण विरोधक - 18मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल, पंजाब, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, बंगाल, नॅशनल क्रिकेट क्लब, विदर्भ, आसाम, महाराष्ट्र, सौराष्ट्र, रेल्वे, सेनादल, इंडियन युनिव्हर्सिटी, हैदराबाद

समर्थक गटएकूण समर्थक - 6तामिळनाडू, त्रिपुरा, ओरिसा, केरळा, जम्मू-काश्मीर आणि श्रीनिवासन यांचं स्वत:चं मत

तळ्यात मळ्यातएकूण मतं - 7बडोदा, हरियाणा, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि झारखंड

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 31, 2013 04:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...