News18 Lokmat

पाकचा उडाला धुव्वा, 83 धावांत गुंडाळलं

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 27, 2016 10:50 PM IST

पाकचा उडाला धुव्वा, 83 धावांत गुंडाळलं

indvspak33227 फेब्रुवारी : आशिया कपमध्ये आज भारतीय गोलंदाजाच्या मार्‍यापुढे पाकिस्तानाने अक्षरश : लोटांगण घेतलं. अवघ्या 83 धावांवर टीम इंडियाने पाकिस्तानला गुंडाळलं. पाकने निर्धारित 20 ओव्हरही खेळता आल्या नाही. भारतासमोर आता 84 धावांचं माफक टार्गेट आहे.

भारत पाकिस्तान मुकाबला म्हटलं तर जणू दुसरं युद्धचं आणि या युद्धाची झलक आज शेर ए बांगला स्टेडियमवर पाहण्यास मिळत आहे. भारताने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंग करण्याचं आव्हान दिलं. मैदानावर उतरलेल्या पाक टीमला पहिल्याच ओव्हरमध्ये आशिष नेहराने दनका दिला. 4 रन्सवर हाफिज सईद आऊट करत भारताने विकेटचं खातं उघडलं. त्यानंतर चौथ्या ओव्हरमध्ये शारजील खानला 7 रन्सवर जसप्रीत वुमराने कॅच घेत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर एकापाठोपाठ गडी बाद होण्याचा क्रम सुरू झाला. सातव्या ओव्हरमध्ये शोयब मलिक अवघ्या 4 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर टीमची कमान सांभाळण्यासाठी आलेल्या कॅप्टन शाहिद आफ्रिदी 1 रन्सवर रन आऊट झाला. त्यानंतर एकाही खेळाडू मैदानावर टिकू शकला नाही. अवघी टीम 83 रन्सवर आऊट झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 27, 2016 08:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...