संदीप चव्हाण, साल्वाडोर, ब्राझील13 जुलै : जर्मन टीमने फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये अगदी दिमाखात प्रवेश केला आहे पण अनेक वादांमुळे जर्मन टीम सध्या वादात आहे.ब्राझीलची अक्षरश: थट्टा उडवत जर्मनीने वर्ल्ड कपची फायनल तर गाठली. पण ऑन फिल्ड ऍक्शनपेक्षा ऑफ द फिल्ड वादांमुळेच जर्मन टीम जास्त चर्चेत राहतेय. घानाविरुद्धची जर्मनीची मॅच लक्षात राहिली ती घानाची टिंगल उडवण्यासाठी जर्मन फॅन्स तोंडाला फासलेल्या काळ्या रंगामुळे.याच मॅचमध्ये नाझी समर्थक प्रेक्षकानं टी शर्ट काढून थेट मैदानात धाव घेतली आणि आता हेच टी शर्ट वादात सापडले आहेत. साल्वाडोरमधल्या इगुतामी या सुपरमॉलमध्ये हेच टी शर्ट सध्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत. पण या प्रदर्शनाबाबत स्थानिक ब्राझिलियन्सनी नाराजी व्यक्त केली आहे.हिटलरच्या नाझीयुगाची आठवण करून देणार्या चिन्हाचं प्रदर्शन केलं तर जर्मनीत कलम 86 अ अन्वये 3 वर्षांची कैद किंवा दंड ठोठावला जातो. पण असं जरी असलं तरी या प्रदर्शनाचे सादरकर्ते डॉ. दुडा सॅम्पोओ यांनी हे टी शर्ट हटवण्यास नकार दिला आहे.Follow @ibnlokmattv// !function(d,s,id){var js,fjsd.getElementsByTagName(s)[0],p/^http:/.test(d.location)?http:https;if(!d.getElementById(id)){jsd.createElement(s);js.idid;js.srcp://platform.twitter.com/widgets.js;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, script, twitter-wjs);// ]]>