मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs SA: कॅच सुटलं, ट्रोल झाला... पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध याच्या बॉलिंगवर दोन 'गोल्डन डक'

Ind vs SA: कॅच सुटलं, ट्रोल झाला... पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध याच्या बॉलिंगवर दोन 'गोल्डन डक'

अर्शदीप सिंग

अर्शदीप सिंग

Ind vs SA: टी20 वर्ल्ड कपआधी टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. पण या मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात सामन्यात टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

तिरुअनंतपूरम, 28 सप्टेंबर: टी20 वर्ल्ड कपआधी टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. पण या मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात सामन्यात टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडाली. दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ अवघ्या 9 रन्समध्येच तंबूत परतला तेही अवघ्या 2.3 ओव्हरमध्ये. ही कमाल केली दीपच चहर आणि डावखुऱ्या अर्शदीप सिंगनं. अर्शदीप सिंगनं पहिल्या 5 पैकी तीन विकेट्स घेतले. महत्वाची बाब म्हणजे त्यानं घेतलेल्या तीनपैकी दोन विकेट्स हे पहिल्या बॉलवर आऊट झालेले बॅट्समन होते.

अर्शदीपचं जबरदस्त कमबॅक

आशिया कपनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अर्शदीपला विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर पहिल्याच सामन्यात खेळताना अर्शदीपनं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये कमाल केली. त्यानं ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर क्विंटन डी कॉक, पाचव्या बॉलवर रुसो आणि सहाव्या बॉलवर डेव्हिड मिलरला माघारी धाडलं. यापैकी दोन बॅट्समन पहिल्याच बॉलवर आऊट झाले. रुसो आणि मिलर पहिल्याच बॉलवर माघारी परतले. दरम्यान हाच अर्शदीप सिंग आशिया कपमध्ये कॅच सुटल्यामुळे ट्रोल झाला होता. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच टी20त मात्र  या पठ्ठ्यानं कमाल केली.

दीपक चहरची दमदार सुरुवात

त्याआधी दीपक चहरनं टीम इंडियानं नव्या बॉलनं सुरुवात केली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दीपक चहरनं दक्षिण आफ्रिकन कॅप्टनला माघारी धाडलं. त्यानंतर आपल्या पुढच्याच ओव्हरमध्ये ट्रिस्टन स्ट्रब्सला पहिल्याच बॉलवर आऊट करुन दक्षिण आफ्रिकेला पाचवा मोठा धक्का दिला.

पाचपैकी तीन 'गोल्डन डक'

दरम्यान या सामन्यात पहिल्या पाचपैकी दक्षिण आफ्रिकेचे 4 बॅट्समन शून्यावर आऊट झाले. त्यापैती तिघे गोल्डन डकची शिकार ठरले. रिसो, स्ट्रब्स आणि मिलर हे तिघेही एकच बॉल खेळून पॅव्हेलियनमध्ये परतले.

First published:

Tags: Sports, T20 cricket, T20 world cup 2022, Team india