मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

अर्शदीपने एका ओव्हरमध्येच जिंकली सगळ्यांची मनं! दाखवून दिलं 'कॅच'पण पकडू शकतो

अर्शदीपने एका ओव्हरमध्येच जिंकली सगळ्यांची मनं! दाखवून दिलं 'कॅच'पण पकडू शकतो

अर्शदीप सिंग

अर्शदीप सिंग

अर्शदीपने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेत आफ्रिकनं बॅट्समनना मैदानावर टिकू दिलं नाही. त्याचसोबत त्यानं चहरच्या बॉलवर थर्डमॅनवर रिले रोसोव्हचा जबरदस्त कॅच घेतला. या कॅचचीदेखील जोरदार चर्चा सोशल मीडियावर आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Lanja, India

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 क्रिकेट सीरीज सुरू झाली आहे. यातील पहिली मॅच बुधवारी (29 सप्टेंबर 2022) तिरुअनंतपुरमच्या ग्रीन फील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाली. या मॅचमध्ये भारताचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय बॉलर्सनी कॅप्टनचा हा निर्णय योग्य ठरवला, आणि 42 रनांवरच आफ्रिकेची निम्मी टीम पॅव्हेलियनमध्ये पाठवली. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेची टीम भारतीय बॉलर्ससमोर नांगी टाकताना दिसून आली.

भारताच्या या विजयात सर्वांत मोठं योगदान फास्ट बॉलर अर्शदीप सिंगचं होतं. त्याने 4 ओव्हरमध्ये 32 रन देत आफ्रिकेच्या महत्त्वाच्या 3 विकेट्स घेतल्या. या उत्कृष्ट खेळीमुळे तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला.

डेव्हिड मिलरची विकेट घेतल्याचा आनंद -

‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरलेल्या अर्शदीपसिंगने सांगितलं की, ‘अनेक दिवसांपासून ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरल्यानंतर नेमकं काय बोलायचं, याची तयारी करत होतो. दीपक चहरने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेतली, आणि प्लॅटफॉर्म सेट केला. त्यामुळे मला खूप मदत झाली. डेव्हिड मिलरची स्विंग बॉलवर विकेट घेतल्यानंतर मला सर्वाधिक आनंद झाला. मी आउटस्विंग करेन, अशी मिलरला अपेक्षा नव्हती. एनसीए (NCA) मधून आल्यानंतर मला खूप फ्रेश वाटत आहे,’ असं सांगतानाच शेवटच्या ओव्हरबाबत बोलताना तो म्हणाला, ‘जेव्हा मी शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आलो, तेव्हा मला वाटलं होतं, की सुरुवातीलाच बॅट्समनची विकेट काढेन; पण शेवटच्या ओव्हरमध्ये आफ्रिकेचे बॅट्समन चांगले खेळले.’

हे वाचा - Ind vs SA: टीम इंडियाचा ऑलराऊंड परफॉर्मन्स, पाहा भारताच्या यशामागचे 5 हीरो

कॅच पकडल्यानंतर गब्बर स्टाईलमध्ये ठोकला शड्डू कारण...

अर्शदीपने पहिल्याच ओव्हरमध्ये तीन विकेट्स घेत आफ्रिकनं बॅट्समनना मैदानावर टिकू दिलं नाही. त्याचसोबत त्यानं चहरच्या बॉलवर थर्डमॅनवर रिले रोसोव्हचा जबरदस्त कॅच घेतला. या कॅचचीदेखील जोरदार चर्चा सोशल मीडियावर आहे. विशेष म्हणजे हा कॅच घेतल्यानंतर अर्शदीपने गब्बर नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनच्या स्टाईलमध्ये मांडीवर शड्डू ठोकला आणि सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ही कृती करून त्यानं अवघड कॅच कसे पकडायचे, हेसुद्धा मला माहिती आहे, असाच जणू संदेश दिला.

दरम्यान, आशिया चषकाच्या सुपर- 4 मॅचमध्ये भारतीय टीम पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाली होती. त्या मॅचमध्ये अर्शदीपने आसिफ अलीचा कॅच सोडला होता. या पराभवानंतर अर्शदीप सिंगवर जोरदार निशाणा साधण्यात आला होता. पण आता त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करत त्याच्या बॉलिंगनेच टीकाकारांना उत्तर दिलं आहे.

First published:

Tags: Cricket, Cricket news, T20 cricket