टीम इंडियाच्या जलद गोलंदाजाविरोधात अटक वॉरंट, विराटचे टेंशन वाढलं!

टीम इंडियाच्या जलद गोलंदाजाविरोधात अटक वॉरंट, विराटचे टेंशन वाढलं!

2018मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मारहाण केल्याचा, अन्याय आणि अत्याचार केल्याचा आरोप केला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 सप्टेंबर : वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रीक घेणारा भारताचा माजी गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याचा भाऊ हसीन अहमद यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. कौटुंबिक हिंसा केल्याप्रकरणी शमीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018मध्ये मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहांने मारहाणी, बलात्कार आणि हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप केले होते. या सगळ्या प्रकरणी हसीन जहाँनं शमी विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळं शमीचे क्रिकेटमधील करिअर पणाला लागले होते. सध्या शमी वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळत आहे. त्यामुळं त्याला तातडीनं भारतात येण्याची विनंती करण्यात आली आहे.

शमीचे पत्नी हसीन जहाँ हिनं शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला होता. तसेच शमीचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचंही हसीन जहाने म्हटलं होतं. आता कोलकाता न्यायालयानं शमी विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. तसेच, शमीला आत्मसमर्पण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

वाचा-वेस्ट इंडिजमधून आली मोठी बातमी, भारतीय संघाला आहे धोका!

या प्रकरणात 20 जणांचा जबाब सादर

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ प्रकरणात तब्बल 20 जणांचा जबाब सादर करण्यात आला होता. हसीन जहांनं अमरोहा पोलिसांवरही आरोप केले होता. या प्रकरणाची चौकशी करण्याती आली होता. तब्बल एका वर्षापासून या दोघांमधील वाद सुरू आहे.

वाचा-राहुलने लाज काढली, नेटीझन्स म्हणाले याच्यापेक्षा इशांत शर्मा बरा!

काय आहे प्रकरण

2018मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मारहाण केल्याचा, अन्याय आणि अत्याचार केल्याचा आरोप केला होता. तसेच हुंड्यासाठी पैसे मागितल्याचाही आरोप केला होता. हसीननं शमीचे फेसुबक आणि व्हॉट्स अॅप चॅटही प्रसारमाध्यमांसमोर आणले होते. शमीचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत असाही आरोप हसीनने केला होता. दरम्यान त्यानंतर हसीन जहाँने फक्त शमीविरोधातच नाही तर त्याच्या कुटुंबीयांविरोधातही तक्रार दाखल केली होती. हुंड्यासाठी कौटुंबिक हिंसाचार करण्यात आला असा आरोप तिने केला होता. हसीन जहाँने तिचा पती मोहम्मद शम्मीविरोधात विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यासोबतच अनेक गंभीर आरोप केले आहेत. हसीन जहाँने शम्मी मॅच फिक्सिंगमध्येही सामील असल्याची शक्यता व्यक्त केली.

वाचा-एका मॅकॅनिकलच्या मुलानं जग जिंकले, प्रेरणादायी प्रवास वाचून व्हाल थक्क!

कोल्हापूरच्या राज घराण्यातील गणेश; न्यू पॅलेसमध्ये बाप्पा विराजमान!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 06:34 PM IST

ताज्या बातम्या