सचिनची 30 वर्षांपूर्वी ज्यांनी केली निवड, त्यांनीच दिली अर्जुनला संघात जागा!

सचिनची 30 वर्षांपूर्वी ज्यांनी केली निवड, त्यांनीच दिली अर्जुनला संघात जागा!

इंग्लंडमध्ये झालेल्या एमसीसी सेकेंण्ड स्पर्धेत 19 वर्षीय अर्जुननं शानदार गोलंदाजी केली होती.

  • Share this:

मुंबई, 07 ऑगस्ट : क्रिकेटच्या इतिहासात बाप-मुलाच्या जोडीला विशेष यश मिळाले नाही. मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन क्रिकेटमध्ये आपली वेगळी जागा निर्माण करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान 30 वर्षांपूर्वी ज्या निवड समितीनं सचिनची मुंबई संघात रणजी ट्रॉफीसाठी निवड केली होती, त्यांनीच अर्जुनची विज्जी ट्रॉफीसाठी निवड केली आहे. त्यामुळं आता सचिननंतर अर्जुनही मुंबई संघातून खेळणार आहे.

दरम्यान, विज्जी ट्रॉफी ही काही मोठी स्पर्धा नाही. ही एक अंडर-23 स्पर्धा आहे, ज्याचे आयोजन बीसीसीआयच्या वतीनं केले जाते. यातील मुंबई संघाकडून आता अर्जुन तेंडुलकरत आपले पदार्पण करणार आहे.

मुंबईचे माजी कर्णधार आणि आता मुख्य निवड समितीचे मिलिंद रेगे यांनी सचिनची आणि आता त्याच्या मुलाची निवड केली आहे. याबाबत इंडिया टुडेशी बोलतानारेगे यांनी, "मला माहित नाही असा निवड समिती प्रमुख कोणी झाला आहे, ज्यानं वडिल आणि मुलगा दोघांची संघात निवड केली. हा केवळ योगायोग नाही, कारण दोघंही तेंडुलकर आहेत", असे सांगितले.

1988मध्ये ज्युनिअर क्रिकेटमध्ये आपल्या खेळीनं अनेक रेकॉर्ड मोडले होते. त्याच्या या खेळीमुळं सचिनला निवड समितीचे तेव्हाचे प्रमुख नरेन तम्हाणे यांनी संघात जागा दिली. तेव्हा सचिनचे वय 15 होते, त्यामुळं जर तो खेळला नाही तर त्याचा आत्मविश्वास तुटू शकतो, अशी भिती सगळ्यांना होती. मात्र सचिनला गुजरात विरोधात मैदानात उतरवण्यात आले, आणि पहिल्याच सामन्यात सचिननं शतकी कामगिरी केली. ही सचिनसाठी फक्त सुरुवात होती. त्यानंतर त्यानं वळून मागे पाहिले नाही.

मात्र अर्जुनचे रेकॉर्ड पाहता जलद गोलंदाजीमध्ये त्याचे रेकॉर्ड विशेष चांगले नाही आहेत. श्रीलंकेत मागच्या वर्षी झालेल्या चार एकदिवसीय सामन्यात अर्जुनची संघात निवड करण्यात आली होती. दरम्यान रेगे यांनी, अर्जुनची क्षमता आणि खेळ बघताच त्याला संघात स्थान देण्यात आले आहे, असे सांगितले.

इंग्लंडमध्ये अर्जुननं केली होती कमाल

इंग्लंडमध्ये झालेल्या एमसीसी सेकेंण्ड स्पर्धेत 19 वर्षीय अर्जुननं शानदार गोलंदाजी केली होती. रेगे यांनी अर्जुनची गोलंदाजी पाहिली होती. अर्जुननं या स्पर्धेत 23 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळं त्याचे प्रदर्शन बघता त्याला संघात स्थान देण्यात आले. 22 ऑगस्टपासून सुरू होणारी स्पर्धा रणजीसाठी रंगीत तालिम मानली जाते.

========================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 01:37 PM IST

ताज्या बातम्या