अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून विदर्भात खेळणार क्रिकेट, 'या' स्पर्धेसाठी झाली निवड

नागपूरमध्ये होणाऱ्या बापुना कपसाठी अर्जुनची मुंबईच्या 15 खेळाडूंच्या संघात निवड झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 26, 2019 07:56 PM IST

अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून विदर्भात खेळणार क्रिकेट, 'या' स्पर्धेसाठी झाली निवड

मुंबई, 26 ऑगस्ट : महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा आणि अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरची मुंबई संघात निवड झाली आहे. नागपूरमध्ये होणाऱ्या बापुना कपसाठी अर्जुनची मुंबईच्या 15 खेळाडूंच्या संघात निवड झाली आहे. सूर्य कुमार यादव या संघाचा कर्णधार असून, सोमवारी मुंबई क्रिकेट संघाच्या वतीनं 15 खेळाडूंच्या निवडीची माहिती देण्यात आली. बापुना कप या स्पर्धेचे आयोजन विदर्भ क्रिकेट संघाच्या वतीनं करण्यात येते. ही स्पर्धा 20 षटकांची असते, मात्र यंदा 50 षटकांची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेल 5 सप्टेंबरपासून सुरुवात होईल.

याआधी अर्जुनची निवड विज्जी ट्रॉफीसाठी मुंबई संघाकडूव झाली होती. 19 वर्षीय अर्जुननं याआधी मुंबई टी-20 लीगमध्ये कमाल केली होती. काही काळ भारतीय संघासाठी अर्जुननं नेटमध्ये गोलंदाजीही केली होती. त्याचबरोबर विनू माकंड अंडर-19 ट्रॉफीमध्येही अर्जुन मुंबई संघाकडून खेळला होता.

एवढेच नाही तर वर्ल्ड कप दरम्यान इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेतही अर्जुन तेंडुलकर खेळला होता. यावेळी अर्जुननं अनेक फलंदाजांच्या त्रिफळा उद्ध्वस्त केला. डावखुरा गोलंदाज असलेल्या अर्जुनने आपल्या गोलंदाजीनं सर्वांन प्रभावित केले. त्याचमुळं वर्ल्ड कप दरम्यान अर्जुननं इंग्लंड संघाला नेटमध्ये गोलंदाजी करवली होती. त्यानंतर भारतीय संघाच्या नेट प्रॅक्टिसमध्येही त्याचा समावेश करण्यात आला होता. यावेळी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री अर्जुनच्या गोलंदाजीनं खुश झाले होते. त्यामुळं आता विदर्भात क्रिकेट खेळण्यासाठी अर्जुन सज्ज असून, या स्पर्धेत मुंबई संघानं अनेक युवा खेळाडूंचा समावेश केला आहे.

वाचा-असा षटकार दररोज मारला जात नाही, पाहा बेन स्टोकचा अफलातून सिक्सर!

मुंबईचा संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), आदित्य तरे, जय बिस्टा, सरफराज खान, शुभम रंजने, रोनक शर्मा, एकनाथ केरकर, सूफियान शेख, आकाश पारकर, शम्स मुलानी, आदित्य धूमल, शशांक अटार्डे, आकिब कुरेशी, कृतिक हनागावाडी, अर्जुन तेंडुलकर.

Loading...

वाचा-कॅरेबियन मैदानात कॅप्टन कोहलीचा दांडिया डान्स, VIDEO VIRAL

मटकी फुटली अन् गोविंदा थेट वरच्या थरावरून जमिनीवर पडला, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 07:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...