'टायगर्स'नी सचिन तेंडुलकरच्या मुलासाठी मोजले पाच लाख !

'टायगर्स'नी सचिन तेंडुलकरच्या मुलासाठी मोजले पाच लाख !

मागच्या वर्षी 19 वर्षांखालील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही अर्जुन सहभागी झाला होता.

  • Share this:

मुंबई, 04 मे: एकीकडं आयपीएलमध्ये कोण बाजी मारणार याची चर्चा सर्वत्र रंगत असताना, आता मुंबई टी-20 लीगची चर्चा रंगू लागली आहे. यात आज महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपली कामगिरी सुधारण्यासाठी अर्जुन झगडत होता. मात्र अखेर अर्जुनला त्याच्या या मेहनतीचं फळ मिळालं आहे.

आज मुंबई ट्वेंटी-20 लीगच्या दुसऱ्या सत्रासाठी होणाऱ्या लिलावात त्यानं वरिष्ठ गटात प्रवेश केला आहे. या लिलावात कोणता संघ अर्जुनला संधी देणार याकडं लक्ष लागले असताला, त्याला आपल्या संघात सामिल करुन घेण्यासाठी सर्व संघांमध्ये चुरस रंगली होती. परंतु त्याला आकाश टायगर्स MWS संघाने चमूत घेतले आहे. अर्जुनसाठी आकाश टायगर्स संघाने 5 लाख रुपये मोजले.

अर्जुन तेंडुलकरनं याआधी मुंबईकडून 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघात खेळण्याचा अनुभव आहे. याशिवाय मागच्या वर्षी 19 वर्षांखालील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो सहभागी झाला होता. त्यात त्यानं तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानं डॉ. डी वाय पाटील ट्वेंटी-20 ट्रॉफीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच त्याची वर्णी मुंबई लीगमध्ये लागली.

मुंबई क्रिकेट असोसिएशनं 2018 पासून मुंबई ट्वेंटी-20 लीगला सुरुवात झाली. या लीगमुळं मुंबईमधील युवा खेळाडूंना एक नवीन संधी मिळाली आहे. या लीगमध्ये सहा संघांचा समावेश होता.

VIDEO : ते 50 लाख कुणाचे पकडले गेले? चंद्रकांत खैरेंचा दानवेंना सवाल

First published: May 4, 2019, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading