अर्जुन तेंडुलकरनं पदार्पणातच साधला बाबांसोबत ‘हा’ योगायोग

अर्जुन तेंडुलकरनं पदार्पणातच साधला बाबांसोबत ‘हा’ योगायोग

आकाश टायगर्सकडून खेळणाऱ्या अर्जुननं आपल्या पदार्पणातच पहिली विकेट घेतली.

  • Share this:

मुंबई, 14 मे: मुंबई इंडियन्स संघानं आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नईला केवळ एका धावानं पराभूत केलं. त्यामुळं आता आयपीएलनंतर सध्या मुंबईत चर्चा आहे ती मुंबई क्रिकेट लीगची. मुंबईतील खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळावं आणि त्याचा फायदा त्यांना व्हावा याकरिता मुंबई क्रिकेट असोसिएशच्या वतीने मागच्या वर्षीपासून मुंबई टी-20 लीगलला सुरवात झाली. आजपासून सरुवात झालेल्या या सामन्यात पहिला सामना आकाश टायगर्स एमडब्लूएस विरुद्ध ट्रम्फ नाईट मुंबई नॉर्थ ईस्ट यांच्यात वानखेडेवर होत आहे.

या सामन्यात ट्रम्फ नाईट यांनी प्रथम फलंदाजी करताना आकाश टायगर्स संघाला 147 धावांचे आव्हान दिले आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष होते ते महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर यांच्याकडे. अर्जुननं मुंबई ट्वेंटी-20 लीगमध्ये मंगळवारी पदार्पण केले. दरम्यान आपल्या पदार्पणातच त्यानं महत्त्वाची विकेट घेतली. आकाश टायगर्स एमडब्लूएस संघाकडून पदार्पण करणाऱ्या अर्जुनने ट्रम्फ नाईट मुंबई नॉर्थ ईस्ट संघाला मोठा धक्का दिला. अर्जुनने सामन्याच्या चौथ्याच षटकात नाईटचा सलामीवीर करण शाहला बाद केले. अर्जुनच्या गोलंदाजीवर करणने टोलावलेला चेंडू आकर्षित गोमेलने टिपला.

दरम्यान या सामन्यात एक अनोखा योगायोग दिसून आला. अर्जुननं 14 मे रोजी वानखेडेवरुन आपला पहिला टी-20 सामना खेळला तर, सचिननं आजच्याच दिवशी वानखेडेवर मुंबई इंडियन्सकडू आपला पहिला सामना खेळला होता.

दरम्यान , अर्जुन तेंडुलकरनं याआधी मुंबईकडून 14, 16 आणि 19 वर्षांखालील संघात खेळण्याचा अनुभव आहे. याशिवाय मागच्या वर्षी 19 वर्षांखालील श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो सहभागी झाला होता. त्यात त्यानं तीन विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, त्यानं डॉ. डी वाय पाटील ट्वेंटी-20 ट्रॉफीत उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावरच त्याची वर्णी मुंबई लीगमध्ये लागली. मुंबई क्रिकेट असोसिएशनं 2018 पासून मुंबई ट्वेंटी-20 लीगला सुरुवात झाली. या लीगमुळं मुंबईमधील युवा खेळाडूंना एक नवीन संधी मिळाली आहे. या लीगमध्ये सहा संघांचा समावेश होता.

वाचा- आयपीएलमध्ये भारताला सापडला 'कॅप्टन कूल', यानं केले विराटच्या कॅप्टन्सीला चॅलेंज

वाचा- तुम्ही IPL पाहण्यात होता दंग, तर इंटरनेटवर गाजत होती मुंबईची 'ही' हॉट फॅन

वाचा- World Cup : ‘ही’ एक चूक पडणार महागात, विराटला 'गंभीर' इशारा

...अन् मरणाने केली सुटका, हा VIDEO तुमचं मन विचलित करू शकतो! VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 06:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading