मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL 2021 Auction: कोणत्या संघात मिळणार अर्जुन तेंडुलकरला संधी? या तीन टीम लावू शकतात बोली

IPL 2021 Auction: कोणत्या संघात मिळणार अर्जुन तेंडुलकरला संधी? या तीन टीम लावू शकतात बोली

IPL Auction 2021: अर्जुनने (Arjun Tendulkar) मुंबई क्रिकेटमध्ये आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज तसंच अर्जुन अष्टपैलू खेळाडू आहे.

IPL Auction 2021: अर्जुनने (Arjun Tendulkar) मुंबई क्रिकेटमध्ये आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज तसंच अर्जुन अष्टपैलू खेळाडू आहे.

IPL Auction 2021: अर्जुनने (Arjun Tendulkar) मुंबई क्रिकेटमध्ये आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज तसंच अर्जुन अष्टपैलू खेळाडू आहे.

    नवी दिल्ली, 8 फेब्रुवारी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुकलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्यासाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण 18 फेब्रुवारीला होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमधील खेळाडूंचा लिलाव (IPL 2021 Auction) होणार आहे आणि त्यात अर्जुननेही अर्ज केला आहे. अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज असून तीन आयपीएल संघ कदाचित अर्जुनला आपल्या टीममध्ये घेऊ शकतात.

    राजस्थान रॉयल्स डावखुऱ्या गोलंदाजाला घेईल का?

    अर्जुनने मुंबई क्रिकेटमध्ये आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज तसंच अर्जुन अष्टपैलू खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या सैयद मुश्ताक अली चषक स्पर्धेत अर्जुन मुंबईच्या संघातून खेळला होता. राजस्थान रॉयल्स या आयपीएल संघात सध्या जोफ्रा आर्चर हा परदेशी वेगवान गोलंदाज तर देशी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट आहे. जर संघाला आणखी एका डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला संघात स्थान द्यायचं असेल तर कदाचित अर्जुनला संधी मिळू शकते.

    मुंबई इंडियन्समध्ये संधी मिळेल का?

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व केलं आहे आणि अजूनही तो संघाशी संबंधित आहे. त्यामुळे कदाचित मुंबईचा संघ अर्जुनला घेऊ शकेल. अगदी संघातून खेळण्याची संधी अर्जुनला या वर्षीच्या आयपीएलमध्ये मिळाली नाही तरीही सराव करताना त्याला जगभरातील दिग्गज खेळाडूंसोबत खेळायची संधी मिळेल. ही संधी त्याच्य भविष्यातील करिअरची पायाभरणी ठरू शकते.

    विराटच्या बेंगळुरूमध्ये अर्जुनला घेता येईल का?

    रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने 2021 लिलावापूर्वी उमेश यादव आणि इसरू उडाना या दोन खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. डेन स्टेन या आयपीएलमध्ये खेळणार नाही. मग कर्णधार विराटच्या बेंगळुरू संघात मोहम्मद सिराज हा वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे विराट कदाचित अर्जुन तेंडुलकरला घेऊन आपल्या संघाचं गोलंदाजी डिपार्टमेंट मजबूत करेल.

    First published:

    Tags: Arjun Tendulkar, Cricket, IPL 2021, Mumbai Indians, Sports, Virat kohli