कुच बिहार ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरचा बाॅलिंग धमाका, घेतल्या 5 विकेट्स

मध्य प्रदेश विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं ५ विकट्स घेतल्यात.

Sonali Deshpande | Updated On: Nov 23, 2017 03:50 PM IST

कुच बिहार ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरचा बाॅलिंग धमाका, घेतल्या 5 विकेट्स

23 नोव्हेंबर : कुच बिहार ट्रॉफीमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं त्याच्या बॉलिंगनं धमाका केलाय. मध्य प्रदेश विरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं ५ विकट्स घेतल्यात.

दुसऱ्या इनिंगमध्ये अर्जुननं मध्य प्रदेशच्या आघाडीच्या चार बॅट्समनना माघारी पाठवलं. आणि खालच्या फळीतल्या एका बॅट्समनला आऊट केलं. अर्जुन तेंडुलकरनं दुसऱ्या इनिंगमध्ये २६ ओव्हरमध्ये ९५ रन्स देत पाच विकेट्स घेतल्या. पहिल्या इनिंगमध्ये अर्जुननं ४२ रन्स देत एक विकेट घेतली.

१९ वर्षांखालील ही उत्तर प्रदेश विरुद्ध मुंबई मॅच ड्राॅ झाली. मध्य प्रदेशनं पहिल्या इनिंगमध्ये ३६१ रन्स केले. तर मुंबईनं पहिल्या इनिंगमध्ये ५०६ रन्स केले. तर दुसऱ्या इनिंगमध्ये  मध्य प्रदेशनं ४११ रन्स केले. तर मुंबईनं दुसऱ्या इनिंगमध्ये ४७ रन्स केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 23, 2017 03:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close