'श्वासही घेता येत नव्हता पण...', कोरोनाला हरवल्यानंतर दिग्गज खेळाडूनं सांगितला खतरनाक अनुभव

'श्वासही घेता येत नव्हता पण...', कोरोनाला हरवल्यानंतर दिग्गज खेळाडूनं सांगितला खतरनाक अनुभव

खेळांमध्ये कोरोनाव्हायरसचा फुटबॉलपटूंवर सर्वाधिक परिणाम झाला. सेरी एच्या बर्‍याच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे सारे जग ठप्प झाले आहे. याचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. मात्र खेळांमध्ये कोरोनाव्हायरसचा फुटबॉलपटूंवर सर्वाधिक परिणाम झाला. सेरी एच्या बर्‍याच खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी बहुतेक खेळाडू जगातील सर्वोत्कृष्ठ फूटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या क्लबशी संबंधित आहेत. युव्हेन्तुसच्या (Juventus F.C.)तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी युव्हेन्तुसचा फॉरवर्ड पाउलो देबलने कोरोनावर मात करत निरोगी झाला आहे. त्याने पुन्हा फूटबॉल सरावालाही सुरुवात केली आहे. पाउलोनं नुकतेच एका वृत्तवाहिनीला कोरोनाचा भयावह अनुभव सांगितला.

पाउलोने युव्हेन्तुस टेलिव्हिजन चॅनेलला सांगितले की, कोरोनाची सर्वाधिक लक्षणे त्याला होती. मात्र आता तो बरा झाला आहे. यासाठी त्याने वैद्यकिय कर्मचारी, कुटुंबिय आणि चाहत्यांचे आभार मानले आहे. 26 वर्षीय पाउलोला फेब्रुवारीमध्ये कोरोना झाल्यासे स्पष्ट झाले होते.

वाचा-क्वारंटाईनमध्येही विरुष्काचा रोमान्स सुरू, विराटसाठी अनुष्का झाली हेअरस्टायलिस्ट

'श्वास घेता येत नव्हता'

पाउलो आपला अनुभव सांगताना, तो चालू किंवा वर्कआउटही करू शकत नव्हता, असे सांगितले. मात्र काही दिवसांपूर्वी त्याला श्वास घेण्यासाठी देखील संघर्ष करावा लागला. कोरोनामुळे सेरी एला 9 मार्च पासून निलंबित करण्यात आले आहे. पाउलो व्यतिरिक्त डॅनियल रुगानी आणि ब्लेझ मॅटुइडी यांनाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्लेझ मॅटुइडी हा 2018 वर्ल्ड चॅम्पियन फ्रांस संघाचा हिस्सा होता. रुगाणी हा या आजाराचा शिकार झालेला पहिला सीरी ए फूटबॉलपटू आहे. रुगाणीचे रिपोर्टनंतर ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही स्वत: ला आयसोलेशनमध्ये ठेवले होते.

वाचा-वर्षाला 800 कोटी कमवणाऱ्या धोनीने कोरोनाग्रस्तांना दिले फक्त 1 लाख, चाहते भडकले

थोडक्यात बचावला रोनाल्डो

पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) या व्हायरसच्या तावडीतून थोडक्यात बचावला. रोनाल्डो युव्हेन्तुसकडून खेळत आहे. पण यावेळी तो पोर्तुगालमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी रोनाल्डोच्या आईची तब्येत बिघडल्ययामुळे तो मायदेशी परतला. त्यानंतर रोनाल्डो आयसोलेशनमध्येच आहे. त्याने ट्रेनिंगलाही सुरुवात केलेली नाही.

वाचा-कोरोनाशी लढाईत भारतीय नाही तर परदेशी खेळाडू आघाडीवर, अब्जाधीशांनी केली इतकी मदत

First published: March 28, 2020, 2:40 PM IST

ताज्या बातम्या