मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

हार्दिक पांड्याची ‘कॅप्टन्सी इनिंग’, 87 धावांची नाबाद खेळी करत IPL कारकिर्दीतील झळकावले 6 वे अर्धशतक

हार्दिक पांड्याची ‘कॅप्टन्सी इनिंग’, 87 धावांची नाबाद खेळी करत IPL कारकिर्दीतील झळकावले 6 वे अर्धशतक

राजस्थान रॉयल्स (Rajastan Royals) विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने बिकट परिस्थितीतून संघाचा डाव सावरला आणि 33 चेंडू खेळून आपले सलग दुसरे अर्धशतक ठोकले. तसेच त्याने  87 धावांची नाबाद खेळी करत आपल्या आयपीएलच्या कारकिर्दीतील सहावे अर्धशतक ठोकले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 14 एप्रिल: गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) बॅट चांगलीच तळपली आहे. राजस्थान रॉयल्स (Rajastan Royals) विरुद्धच्या सामन्यात हार्दिकने बिकट परिस्थितीतून संघाचा डाव सावरला आणि 33 चेंडू खेळून आपले सलग दुसरे अर्धशतक ठोकले. तसेच त्याने 87 धावांची नाबाद खेळी करत आपल्या आयपीएलच्या कारकिर्दीतील सहावे अर्धशतक ठोकले आहे.

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये आज 24 वा सामना खेळला जात आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स (RR vs GT) आमनेसामने आहेत. हार्दिक पांड्या याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी करत गुजरातच्या संघाचा डाव सावरला. हार्दिक पांड्याने मोक्याच्या क्षणी वादळी खेळी केली. पांड्याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात 192 धावांपर्यंत मजल मारली.

पांड्याने नाबाद 87 धावांची खेळी करत आयपीएल कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले. हार्दिक पांड्याने आपल्या डावात 52 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार आणि 4 षटकार खेचले.

हार्दिक पांड्याची आयपीएलमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. 2019 च्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याने 34 चेंडूत 91 धावांची खेळी केली होती. ही त्याची आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. 2015 मध्ये हार्दिक पांड्याने कोलकाता विरुद्धच 31 चेंडूत नाबाद 61 धावा केल्या होत्या. याशिवाय गत हंगामात अबुधाबीच्या मैदानात त्याने राजस्थान रॉयल्स विरुद्ध 21 चेंडूत नाबाद 60 धावांची खेळी केली होती.

पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करताना हार्दिक पांड्याची कामगिरीही कमालीची उंचावली आहे. तो टीम इंडियाकडून मैदानात उतरण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.

आयपीएल चौथ्या नंबरवर कर्णधारामध्ये सर्वोच्च स्कोर

दिनेश कार्तिक विरुद्ध आरआर 2019 रन 97

रोहित शर्मा विरुद्ध आरसीबी 2018 रन 94

हार्दिक पांड्या विरुद्ध आरआर 2022 रन 87

First published:

Tags: Csk, Gujarat Titans, Hardik pandya, Ipl 2022, Mumbai Indians