Home /News /sport /

Google Doodleच्या माध्यमातून आरती साहांचा सन्मान, जगभरात देशाचं नाव रोशन करणारी 'हिंदूस्तानी जलपरी'

Google Doodleच्या माध्यमातून आरती साहांचा सन्मान, जगभरात देशाचं नाव रोशन करणारी 'हिंदूस्तानी जलपरी'

भारताच्या माजी ऑलिंपियन जलतरणपटू आरती साहा (Aarti Saha) यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडल (Google Doodle) प्रदर्शित करून त्यांचा सन्मान केला आहे.

    मुंबई, 24 सप्टेंबर : भारताच्या माजी ऑलिंपियन जलतरणपटू आरती साहा (Aarti Saha) यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडल (Google Doodle) प्रदर्शित करून त्यांचा सन्मान केला आहे.  साहा यांना 1960 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. भारत सरकारच्या वतीने देण्यात येणारा पद्मश्री हा मानाचा चौथा पुरस्कार असून, तो मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू आहेत. इंग्लिश चॅनेल पोहून पार करणाऱ्या त्या पहिल्या आशियाई महिला आहेत.  हे डुडल कोलकात्यातील चित्रकार लावण्या नायडू यांनी बनवले आहे. आरती यांचा जन्म कोलकात्यात 24 सप्टेंबर 1940 रोजी झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासूनच त्या हूगळी नदीमध्ये पोहण्यास शिकल्या. आरती या दीर्घपल्ल्याच्या जलतरणपटू आहेत. सचिन नाग यांनी आरती यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना या प्रोफेशनल खेळात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. त्यानंतर त्यांनी भारताचे अव्वल जलतरणपटू मिहीर सेन यांच्यापासून प्रेरणा घेऊन इंग्लिश खाडी पोहून पार केली होती. त्यांना 'हिंदूस्तान जलपरी' या नावाने देखील ओळखले जाते. (हे वाचा-पांड्याचा इंजमाम अवतार! अशी अजब विकेट तुम्ही कधीच पाहिली नसेल, पाहा VIDEO) तरुणपणी गंगेमध्ये दूरवर पोहत जाणाच्या स्पर्धांमध्ये आरती भाग घ्यायच्या. 1958 मध्ये ब्युटलिन इंटरनॅशनल क्रॉस चॅनल जलतरण स्पर्धेत ब्रोजन दास यांनी इंग्लिश खाडी पोहून पार केली होती आणि ही खाडी पोहणारे पहिले पुरुष जलतरणपटू म्हणून त्यांनी बहुमान पटकावला होता. खाडी पोहण्याची अर्थात दीर्घपल्ल्याच्या जलतरणाची पहिली प्रेरणा आरती यांना ब्रोजन यांच्याकडून मिळाली होती. 1952 च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत आरती यांनी डॉली नझीर यांच्यासोबत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या स्पर्धेत भाग घेतलेल्या चार खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश होता आणि भारतीय टीममधील त्या सर्वांत तरुण खेळाडू होत्या. आरती यांनी 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारातील शर्यत 3 मिनिटं आणि 40.8 सेकंदांत पूर्ण केली होती. (हे वाचा-MI vs KKR : रोहित शर्माचं अनोखं 'द्विशतक', नावावर केला आणखी एक विक्रम!) एकदा देशबंधू पार्कमधील तलावात त्या सलग आठ तास पोहल्या होत्या आणि नंतर तर त्यांनी सलग 16 तास जलतरण केलं होतं. सहा वर्षांच्या प्रशिक्षणानंतर 24 जुलै 1959 ला त्या इंग्लंडला गेल्या. 4 ऑगस्ट 1994 ला त्यांना कावीळ झाल्यामुळे खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी मृत्युशी 19 दिवस झुंज दिली. 23 ऑगस्ट 1994 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या