अनुष्काने कॅमेरा सुरु करताच विराटचे विचित्र हावभाव, सानिया मिर्झाने केली 'ही' कमेंट

अनुष्काने कॅमेरा सुरु करताच विराटचे विचित्र हावभाव, सानिया मिर्झाने केली 'ही' कमेंट

भारताचा कर्णधार विराट कोहलीसोबत त्याची पत्नी अनुष्काने एक सेल्फी पोस्ट केला आहे. यामध्ये विराट कोहली चित्रविचित्र हावभाव करताना दिसत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मार्च : बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने पती विराट कोहलीसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. चित्रविचित्र भाव चेहऱ्यावर असलेल्या विराटचा हा फोटो व्हायरल होत आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर विराटसोबतचा सेल्फी टाकला आहे. त्यात अनुष्काने जीभ बाहेर काढली आहे तर विराटने डोळे फिरवत विचित्र चेहरा केला आहे.

अनुष्काने फोटो शेअर करताना म्हटलं की, आयसोलेशन आपल्याला प्रत्येक मार्गाने आणि पद्धतीने एकमेकांवर प्रेम करण्यास मदत करते. अनुष्काच्या या फोटोवर टेनिस स्टार सानिया मिर्झानेसुद्धा कमेंट केली आहे. सानियाने हार्टचा इमोजी टाकला आहे.

याआधी अनुष्का आणि विराटनं एक व्हिडिओ पोस्ट करून संदेश दिला होता. कोरोनामुळे सध्या नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि काळजी घ्यावी असं सांगितलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनुष्का-विराटनं व्हिडिओमधून चाहत्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.

हे वाचा : टीम इंडियाच्या जादुगरची जादू पाहिलीत का? BCCI ने शेअर केला VIDEO

फक्त अनुष्का विराटनेच नाही तर अनेक दिग्गज खेळाडूंनी आणि व्यक्तींनी सोशल मीडियावरून कोरोनाबाबत जनजागृती केली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन सर्वांनीच केलं आहे.

हे वाचा : ज्या गोलंदाजाने विराटला दिली होती धमकी, आता Coronavirus संपवणार करिअर

First published: March 21, 2020, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading