तिरुवनंतपूरम, 15 जानेवारी : भारत आणि श्रीलंका यांच्यातील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. कर्णधार रोहित शर्माचा हा निर्णय फलंदाजांनी सार्थ ठऱवला. युवा फलंदाज शुभमन गिलने शतक केलं. त्यानतरं विराट कोहलीने दीडशतक केलं. विराटच्या झंझावाती शतकानंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर कौतुकाच वर्षाव होत आहे.
विराटने त्याचं एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतलं 46वं शतक पूर्ण केलं. त्यानतंर पुढच्या 21 चेंडूत आणखी 50 धावा केल्या. विराटने 110 चेंडूत 166 धावा काढताना 8 षटकार आणि 13 चौकार मारले. त्याच्या या कामगिरीने अनेक विक्रमही मोडले.
हेही वाचा : INDvsSL : चेंडू अडवताना दोघे धडकले, वेदनेनं मैदानावरच लोळले; Photo Viral
विराटच्या या कामगिरीचं कौतुक पत्नी अनुष्का शर्माने केलं आहे. तसंच विराटची बहीण भावना कोहली हिनेही विराटचा अभिमान असल्याचं म्हणत इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. अनुष्काने सोशल मीडियावर फोटो शेअर केला असून तिने म्हटलं की, शाब्बास, काय खेळी खेळलीय. यासोबत तिने विराटचा शतकानंतरचा फोटो पोस्ट केला आहे.
हेही वाचा : विराटने धोनीच्या स्टाइलने मारला सिक्स, हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडीओ व्हायरल
विराट कोहलीने डिसेंबरनंतर आतापर्यंत चार एकदिवसीय सामने खेळले आहेत. यातील तीन सामन्यात शतक केलं ओआहे. कोहलीने 10 डिसेंबरला बांगलादेशविरुद्ध शतक केलं होतं. त्यानतंर आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यात दोन शतके केली आहेत. विराट आणि शुभमन गिल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर 391 धावांचं मोठं आव्हान दिलं होतं. भारताने हा सामना ३१७ धावांनी जिंकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anushka sharma, Virat kohli