'मला 2014 मधला तो दिवस आठवतो जेव्हा तु मला सांगितले होतेस की, तुला कर्णधार बनवण्यात आले आहे. कारण एमएसने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मला आठवतंय एमएस, तू आणि मी त्या दिवशी गप्पा मारल्या होत्या आणि तो सांगत होता की तुझी दाढी किती लवकर पांढरी होईल. तेव्हा सर्वत्र एकच हशा पिकला होता. त्या दिवसापासून, मी तुझी दाढी पांढरी झालेली पाहिली आहे. मी वाढ पाहिली आहे. अफाट वाढ. तुझ्या आजूबाजूला आणि तुझ्या आत. आणि हो, भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून तुझी प्रगती आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघाने कोणती कामगिरी केली याचा मला खूप अभिमान आहे. पण तू स्वतःमध्ये जी वाढ केली आहेस. त्याचा मला अधिक अभिमान आहे. अशी भावना अनुष्काने व्यक्त केली आहे. विराट कोहली हा टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला, तर इंग्लंडच्या जमिनीवर टेस्ट सीरिजमध्ये आघाडी घेतली. एमएस धोनीने 2014 साली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार झाला होता.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Test cricket, Virat anushka, Virat kohli