मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: विरुष्काची बायो बबल लाईफ पाहून अभिनेता रणवीर सिंगने दिली भन्नाट कमेंट

T20 World Cup: विरुष्काची बायो बबल लाईफ पाहून अभिनेता रणवीर सिंगने दिली भन्नाट कमेंट

T20 World Cup: अनुष्काने शेअर केली विराटसोबतची बायो बबल लाईफ

T20 World Cup: अनुष्काने शेअर केली विराटसोबतची बायो बबल लाईफ

अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आपल्या पतीला म्हणजेच विराट कोहलीला (Virat Kohli)भेटण्यासाठी थेट यूएईमध्ये दाखल झाली आहे. पण, बायो-बबलमध्ये (Bio-Bubble) नियमामुळे दोघांची भेट काही केल्या घडली नाही.

  • Published by:  Dhanshri Otari
दुबई, 17 ऑक्टोबर : टी20 वर्ल्ड कपला (T20 World Cup 2021) आजपासून (17 ऑक्टोबर) यूएई आणि ओमानमध्ये सुरुवात होत आहे. दरम्यान, अभिनेत्री अनुष्का शर्मा(Anushka Sharma) आपल्या पतीला म्हणजेच विराट कोहलीला (Virat Kohli)भेटण्यासाठी थेट यूएईमध्ये दाखल झाली आहे. पण, बायो-बबलमध्ये (Bio-Bubble) नियमामुळे दोघांची भेट काही केल्या घडली नाही. नाराज अनुष्काने काही फोटो शेअर करत विराटसोबतची बायो बबलची लाईफ सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण विरुष्का जोडीची अशी अवस्था पाहता अतरंगी अभिनेता रणवीर सिंगने भन्नाट कमेंट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमुळे लांब असल्याने अनुष्का थेट यूएईमध्ये दाखल झाली आहे. पण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इतर खेळाडूंप्रमाणे बायो-बबलमध्ये (Bio-Bubble) आहे. त्यामुळे दोघांची भेट काही केल्या झाली नाही. त्यामुळे दोघेही लांबूनच एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. हे वाचा- T20 World Cup: पाकिस्तानच्या जर्सीवर भारताचं नाव, Video Viral होताच आली जाग अनुष्काने नुकतचं विराटचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये दोघेही एकमेकांपासून दुर दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना अनुष्काने विराटसोबतची बायो बबलची लाईफ कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
अनुष्काची ही पोस्ट पाहता, अतरंगी अभिनेता रणवीर सिंगने भन्नाट कमेंट केली आहे. "क्या, यार" अशी गमंतशीर कमेंट करत रणवीरने चिडवण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे टेनिसपटू सानिया मिर्झाने, मी तुला समजू शकते असे म्हटले आहे. काही दिवसापूर्वी, इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर करत विराटने बायो-बबलमध्ये राहणं किती कठीण असतं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोमध्ये विराट एका खूर्चीवर बसला आहे आणि त्याचा हात दोरीने बांधून ठेवण्यात आला आहे. virat kohli ipl 2021 bio bubble 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. युएई आणि ओमानमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट या फॉरमॅटमधली टीम इंडियाची कॅप्टन्सीही सोडणार आहे.
First published:

Tags: Anushka sharma, T20 world cup, Virat anushka, Virat kohli, Virat kohli and anushka sharma

पुढील बातम्या