Home /News /sport /

'आम्हाला माहितीही नव्हतं..'; वामिकाचे फोटो व्हायरल होताच अनुष्काने शेअर केली पोस्ट, केलं हे आवाहन

'आम्हाला माहितीही नव्हतं..'; वामिकाचे फोटो व्हायरल होताच अनुष्काने शेअर केली पोस्ट, केलं हे आवाहन

आजपर्यंत वामिकाचा चेहरा कोणी पाहिलेला नाही. पहिल्यांदा ती अशी कॅमेऱ्यासमोर आली आहे. यावरुनच अनुष्का शर्माने पोस्ट करत तिचे फोटो व्हायरल न करण्याची विनंती केली आहे.

  नवी दिल्ली, 24 जानेवारी : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) केपटाऊनमध्ये आहेत. केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण अफ्रिकाच्या संघामध्ये शेवटचा सामना खेळला जात आहे. यावेळी अनुष्काने मुलगी वामिकाला घेऊन कॅमेऱ्यात कैद झाली. अनुष्का आणि वामिकाचा फोटो सोशल मीडियावर (Virat Kohli Daughter Vamika first picture) व्हायरल होत आहे. पहिल्यांदा वामिका अशी टीव्हीवर दिसली आहे. आजपर्यंत वामिकाचा चेहरा कोणी पाहिलेला नाही. पहिल्यांदा ती अशी कॅमेऱ्यासमोर आली आहे. यावरुनच अनुष्का शर्माने इन्स्टाग्राम पोस्ट (Anushka Sharma Instagram Post) करत तिचे फोटो व्हायरल न करण्याची विनंती केली आहे. 'आमच्या मुलीचे फोटो काल स्टेडियममध्ये कॅप्चर केले गेले आणि त्यानंतर ते मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आले. आम्हाला नकळतपणे कॅप्चर करण्यात आलं. आमच्यावर कॅमेरा असल्याचं आम्हाला माहित नव्हतं. या प्रकरणावर आमची भूमिका आणि विनंती आधीप्रमाणेच आहे. आम्ही आधी सांगतिल्याप्रमाणे वामिकाचे फोटो कृपया पब्लिश करू नका' अशा आशयाची पोस्ट करत अनुष्का शर्माने सर्वांना आपल्या लेकीचे फोटो पब्लिश, व्हायरल न करण्याची विनंती केली आहे. काही दिवसापूर्वीच अनुष्का आणि विराटने मुलगी वामिकाचे फोटो किंवा व्हिडिओ न केल्याबद्दल मीडिया आमि पापाराझींचे आभार मानले होते. नुकताच वामिकाचा पाहिला वाढदिवस झाला आहे. या वाढदिवसाचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

  हे वाचा - Virat Kohli Daughter Vamika first picture : ....अशी दिसते अनुष्काची लेक वामिका, बाबा विराटला चेअर करताना कॅमेऱ्यात कैद

  विराट कोहली आणि अनुष्का शर्माने सुरूवातीपासून मुलगी वामिकाचा फोटो शेअर केलेला नाही. शिवाय त्यांनी मीडियाला देखील तशीच विनंती केली आहे. सध्या दोघेही मुलगी वामिकाला सोशल मीडियापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतात.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Anushka sharma, Virat kohli

  पुढील बातम्या