‘खूप सहन केलं, आता नाही’, वर्ल्ड कपमधल्या चहा प्रकरणावर भडकली अनुष्का

वर्ल्ड कपमधल्या चहा प्रकरणावर भडकली अनुष्का म्हणाली...

News18 Lokmat | Updated On: Oct 31, 2019 08:04 PM IST

‘खूप सहन केलं, आता नाही’, वर्ल्ड कपमधल्या चहा प्रकरणावर भडकली अनुष्का

नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट संघाचे माजी विकेटकीपर फारूख इंजिनिअर यांनी वर्ल्ड कपमध्ये भारतीय निवड समितीवर गंभीर आरोप केले होते. फारूख यांनी सिलेक्टर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला सेवा देत चहा देण्यात व्यस्त होते, असा गंभीर आरोप केला होता. दरम्यान अनुष्कानं ट्विटरवरून त्यांचा खरपूस समाचार घेतला.

81 वर्षीय फारूख यांनी, निवड समितीतील काही लोक वर्ल्ड कपमध्ये अनुष्का शर्माला चहाचा कप देण्याते काम करत होते, अशा शब्दात टिका केली आहे. एवढेच नाही तर निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यावर अनुष्कानं फारूख आणि टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. अनुष्कानं ट्वीट करत, आपला राग व्यक्त केला.

वाचा-'टीम इंडियाचा सिलेक्टर देता होता अनुष्काला चहा', माजी क्रिकेटपटूचा आरोप

अनुष्कानं ट्वीट करत व्यक्त केला राग

अनुष्का शर्मानं ट्वीट करत, “माझ्याबद्दल खोटी माहिती छापली जाते. मी नेहमी शांत राहिले. विराटसोबत माझे लग्न झाले नव्हते तेव्हा त्याच्या खराब फॉर्मचे खापर माझ्यावर फोडले जायचे. माझ्यावर क्रिकेट बोर्डाकडून विदेश दौऱ्यासाठी तिकीट घेत असल्याचे आरोप करण्यात आले होते. पण मी स्वत:च्या पैशांनी दौऱ्यावर जायचे. मला सांगितलेल्या सर्व नियमांचे मी पालन केले आहे”, असे म्हणत राग आपला राग व्यक्त केला.

Loading...

वाचा-सौरव गांगुलीच्या राज्यात द्रविडच्या अडचणी आणखी वाढल्या, पुन्हा मिळाली नोटीस

‘मला चहा नाही कॉफी आवडते’

अनुष्कानं आपल्या ट्वीटमध्ये सतत लोक खोट्याला खरे मानतात असे सांगितले. त्यावर टीकाकारांची शाळा घेत, “मी माझ्या करिअरमध्ये अनेक वादांवर शांत राहिली आहे. मात्र माझ्यावर निवड समितीनम माझी सेवा केली, मला चहा दिला, असा आरोप करण्यात आला. पण मी वर्ल्ड कपमध्ये फॅमेलि बॉक्समध्ये होते. तुम्हाला जर निवड समितीवर टीका करायची आहे, तर माझं नाव घेऊ नका. आणि मुळात मला चहा आवडत नाही मी कॉफी पिते”, असे म्हणत टीकाकारांनी सडेतोड उत्तर दिले.

फारूख यांनी निवड समितीवर केले आरोप

'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत फारूख यांनी, “सध्याच्या निवड समितीकडे अनुभव नाही. ही खर तर मिकी माऊसवाली टीम आहे. विराट कोहलीचे योगदान भारतासाठी महत्त्वाचे आहे पण निवड समिती योग्य आहे का? त्यांनी फक्त 10-12 कसोटी सामने खेळले आहे. एवढेच नाही तर वर्ल्ड कपमध्य निवड समितीच्या एका सदस्यानं अनुष्काला चहा देण्याचे काम केले होते”, असा खळबळजनक आरोप केला. त्यामुळं त्यांनी निवड समितीमध्ये दिलीप वेंगसरकर यांसारखे खेळाडू असावे, असे मत व्यक्त केले होते.

वाचा-टी-20च्या जगज्जेतेपदासाठी 16 संघ सज्ज, भारतासह 'हा' संघ प्रबळ दावेदार

VIDEO: सत्तास्थापनेच्या वक्तव्यावरून खासदार संजय राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2019 08:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...