7 वर्षांच्या मुलाच्या ऑटोग्राफसाठी विराटही थांबला, अनुष्कानं दिली 'ही' रिअॅक्शन

7 वर्षांच्या मुलाच्या ऑटोग्राफसाठी विराटही थांबला, अनुष्कानं दिली 'ही' रिअॅक्शन

एका सात वर्षांच्या छोट्या चाहत्यामुळं विराटला थांबवून एक विनंती केली.

  • Share this:

जमैका, 03 सप्टेंबर : भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा समाप्त झाला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका आपल्या खिशात घातली. कसोटी मालिकेत 2-0नं क्लिन स्विप देत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. याचबरोबर विराट भारताचा सर्वाधिक कसोटी जिंकणारा कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा हा 28 वा विजय आहे. यामध्ये त्यानं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं 27 कसोटी जिंकल्या होत्या. परदेशात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सामने जिंकण्याच्याआधी विराट आता पहिल्या क्रमांकावर आहे.

दरम्यान 15 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेचा संघा भारत दौऱ्यावर येणार आहे. यावेळी टी-20 आणि कसोटी सामने खेळले जाणार आहे. दरम्यान वेस्ट इंडिज विरोधात 2-0नं मालिका विजय मिळवत विराटसेना टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 120 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळं विराट कोहली सध्या खुश आहे. मात्र वेस्ट इंडिजमध्ये असे एक अजब प्रकार घडला. विराटनं एका सात वर्षांत्या मुलाकडून स्वाक्षरी घेतली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हैरान झाला विराट कोहली

जमैकामध्ये झालेला दुसरा कसोटी सामना संपल्यानंतर विराट कोहली हॉटेलवर जात होता. त्यावेळी सात वर्षांच्या मुलानं एक अजब मागणी केली. विराटजवळ जाऊन त्या मुलानं माझी स्वाक्षरी घेणार का अशी विनंती केली. विराटला त्याला नाही म्हणू शकला नाही, अखेर विराटनं त्याची स्वाक्षरी घेतली. यावेळी अनुष्का विराटच्या जवळ उभी होती. त्या दोघांनी हसत हसत त्याची स्वाक्षरी घेतली.

वाचा-रॅंकिंगमध्ये टीम इंडिया जिंकली पण विराट हरला! अव्वलस्थानी पोहचला 'हा' खेळाडू

विराट कोहलीनं गमावले पहिले स्थान

विराट कोहलीचं कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येण्याचे मुख्य कारण जमैकामध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या चेंडूत बाद झाला हे आहे. पहिल्या डावात विराटनं अर्धशतक लगावले. त्यावेळी 76 धावा करत विराट बाद झाला. मात्र दुसऱ्या डावात कोहली शुन्यावर बाद झाला. त्यामुळं आयसीसीच्या ताज्या रॅकिंगनुसार विराट कोहलीचे 903 अंक आहेत. शुन्यावर बाद झाल्यामुळं विराटला 7 अंकांचा फटका बसला. तर, स्टिव्ह स्मिथचे 904 अकं आहेत.

वाचा-कसोटीच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा धमाका, पाहा कोण कितव्या स्थानी

4 डावांत कोहलीनं केल्या 136 धावा

कर्णधार विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार झाला असला तरी, फलंदाजीमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. विराटनं दोन सामन्यातील चार डावांत केवळ 136 धावा केल्या. या कसोटी मालिकेत त्यानं 34च्या सरासरीनं धावा केल्या यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

वाचा-कसोटीत सर्वात यशस्वी कर्णधार झाला विराट, धोनीला मागे टाकल्यानंतर म्हणाला...

मायलेकीनी धाडस केलं अन् सोनसाखळी चोरांना शिकवला चांगलाच धडा, पाहा हा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: September 3, 2019, 7:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading