बर्थ डे स्पेशल : अनुष्कानं मला जेंटलमन बनवलं - विराट कोहली

आज विराट कोहलीचा वाढदिवस. आपल्या वाढदिवशी विराटनं अनुष्काबद्दलची काही गुपितं उघड केलीयत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2017 06:51 PM IST

बर्थ डे स्पेशल : अनुष्कानं मला जेंटलमन बनवलं - विराट कोहली

05 नोव्हेंबर : आज विराट कोहलीचा वाढदिवस. आपल्या वाढदिवशी विराटनं अनुष्काबद्दलची काही गुपितं उघड केलीयत.

एखाद्या पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो असं म्हणतात ते काही खोटं नाही. क्रिकेटपट्टू विराट कोहलीच्याही आयुष्यात अशीच एक स्त्री आहे ज्यामुळे त्याच्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं आहे.2015 मध्ये विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत क्रिकेटपट्टू विराट कोहली अपयशी ठरल्यानंतर अनेक ठिकाणी अनुष्काचा पुतळा जाळला गेला पण असं असलं तरी विराटचा ठाम विश्वास आहे की त्याच्या यशामागे अनुष्का शर्माची महत्त्वाची भूमिका आहे.

'ब्रेकफास्ट विथ चॅपियन' या गौरव कपूर यांच्या शोमध्ये विराटने कबूल केलं की, 'माझं व्यक्तिमत्त्व बळकट करण्यासाठी अनुष्काने मला खूप मदत केली.'

अनुष्का आणि त्यांच्या नात्याबद्दल बोलताना विराटने सांगितले की, 'मला जेंटलमन बनवण्यामागे माझ्या अनुष्काची जादू आहे.अनुष्काने मला खूप काही गोष्टी शिकवल्या आहेत.'

तो म्हणतो, 'तिच्या येण्यानंतर माझ्यात खूप चांगले बदल झाले. मागच्या 4 वर्षात मॅनर्सपासून ते एखाद्या गोष्टीसाठी संयम ठेवण्यापर्यंत सगळं तिने मला शिकवलं. माझ्या कठीण काळात माझ्या बरोबर उभी राहिली, मला समजून घेतलं. मला नेहमी प्रोत्साहन दिलं. तिच्या मदतीमुळेच मी इतका यशस्वी झालो आहे.'

Loading...

'ती नेहमीच एका खडकासारखी माझ्या मागे उभी राहिली.' एकमेकांना साथ देणाऱ्या अनुष्का आणि विराटच्या जोडीला आमच्याकडूनही शुभेच्छा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2017 06:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...