• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • भारतीय क्रिकेटपटू डोपिंगमध्ये फेल, 4 वर्षांच्या बंदीची कारवाई

भारतीय क्रिकेटपटू डोपिंगमध्ये फेल, 4 वर्षांच्या बंदीची कारवाई

भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा डोपिंगने डोकं वर काढलं आहे. महिला क्रिकेटपटू अंशुला राव (Anshula Rao) डोप टेस्टमध्ये फेल गेली आहे, यानंतर नाडा (NADA)च्या पॅनलने अंशुलावर 4 वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जून: भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा डोपिंगने डोकं वर काढलं आहे. महिला क्रिकेटपटू अंशुला राव (Anshula Rao) डोप टेस्टमध्ये फेल गेली आहे, यानंतर नाडा (NADA) च्या पॅनलने अंशुलावर 4 वर्षांच्या बंदीची कारवाई केली आहे. मध्य प्रदेशची खेळाडू असलेल्या अंशुलाच्या दोन्ही चाचण्यांचे निकाल समोर आल्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली. अंशुलाला बी सॅम्पलच्या तपासणीसाठी लागलेले 2 लाख रुपयेही द्यावे लागणार आहेत. अंशुला डोप टेस्टमध्ये निलंबित होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नॅशनल ऍण्टी डोपिंग एजन्सी म्हणजेच नाडाने अंशुलावर 4 वर्षांची बंदी घातली आहे. मध्य प्रदेशकडून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळणारी अंशुला राव प्रतिबंधीत पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळली आहे. अंशुला राव 2019-20 साली अंडर-23 स्पर्धेत शेवटची मैदानात उतरली होती. याआधी मागच्या वर्षीही मार्च महिन्यात उत्तेजक पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी तिचं निलंबन करण्यात आलं होतं. तेव्हाही अंशुलाला याप्रकरणाची योग्य माहिती देता आली नव्हती. अंशुला रावचे दोन सॅम्पल तपासणीसाठी बेल्जियमला पाठवण्यात आले होते, यामध्ये तिने प्रतिबंधित पदार्थ घेतल्याचं निष्पन्न झालं. अंशुला रावने याप्रकरावर प्रतिक्रिया दिली आहे. डोप टेस्ट आणि नाडाने लावलेल्या आरोपांमध्ये जवळपास 4 महिन्यांचा काळ निघून गेला आहे. माझ्याकडून बी सॅम्पलची तपासणी करण्यासाठी 2400 युरो म्हणजेच जवळपास 2 लाख रुपये घेण्यात आले, हा माझ्यासोबत गैरव्यवहार केला गेला, असा आरोप अंशुलाने केला आहे. पृथ्वी शॉवरही घातली होती बंदी याआधी भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉदेखील डोप टेस्टमध्ये दोषी आढळला होता, ज्यामुळे त्याचंही निलंबन करण्यात आलं होतं. 2019 साली स्थानिक स्पर्धेमध्ये कफ सिरप घेतल्यानंतर शॉची डोप टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. खोकल्यामुळे आपण कफ सिरप घेतलं असल्याचं नंतर पृथ्वी शॉने सांगितलं.
  Published by:Shreyas
  First published: