क्रीडा विश्वातून आणखी एक वाईट बातमी; भारतातील प्रसिद्ध क्रिकेटरचं झोपेतचं निधन

क्रीडा विश्वातून आणखी एक वाईट बातमी; भारतातील प्रसिद्ध क्रिकेटरचं झोपेतचं निधन

कोल्हापूरातील निवासस्थानी झोपेतच त्यांनी शेवटचा श्वास घेतला

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट विश्वातून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतातील दिग्गज क्रिकेटर सदाशिव रावजी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. माजी क्रिकेटर सदाशिव रावजी पाटील यांचं मंगळवारी कोल्हापूरातील त्यांच्या निवासस्थानी शेवटचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पती, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

कोल्हापूरातील जिल्हा क्रिकेट संघाचे माजी पदाधिकारी रमेश कदम यांनी पीटीआयला सांगितले की, पाटील कोल्हापूरातील रुईकर कॉलनीत आपल्या निवासस्थानी मंगळवारी झोपेतचं निधन झाले. जलद गोलंदाजी, ऑलराऊंडर पाटील यांनी एका टेस्ट मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र एकाच मॅचमध्ये त्यांना आपल्या गोलंदाजीचा कमाल दाखविण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर मात्र त्यांना संधी मिळाली नाही.

एका टेस्टमध्ये केलं होतं.

हे ही वाचा-धक्कादायक! मुंबईत माजी क्रिकेटपटू सचिन देशमुख यांचा कोरोनामुळे मृत्यू

सदाशिव यांनी 1955 मध्ये न्यूजीलँडविरोधात एका टेस्ट मॅचमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. या मॅचमध्ये त्यांनी 51 धावा घेत 2 विकेट घेतले होते. यामध्ये त्यांनी न्यूजीलँडचे दिग्गज खेळाडू जॉन वने थेव यांना बाद केलं होतं. पाटील यांनी 1952ृ1964 दरम्यान 36 प्रथम श्रेणी मॅचमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं होतं. ज्यामध्ये त्यांनी 3 अर्धशतकासह एकूण 866 धावा काढल्या. एकूण 83 विकेट घेतले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये गोलंदाजात त्यांचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन 38 धावांवर पाच विकेट राहिलं आहे. ज्यामध्ये 3 वेळा ते 5 विकेट क्लबमध्ये सामील झाले.

Published by: Meenal Gangurde
First published: September 17, 2020, 9:33 PM IST

ताज्या बातम्या