Srilanka : भारताचा माजी क्रिकेटपटू बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावला

Srilanka : भारताचा माजी क्रिकेटपटू बॉम्बस्फोटातून थोडक्यात बचावला

श्रीलंकेत पर्यटनासाठी गेलेला भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे बॉम्बस्फोट झालेल्या एका हॉटेलमध्येच त्यादिवशी होता.

  • Share this:

कोलंबो, 23 एप्रिल : श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने जग हादरून गेलं आहे. राजधानी कोलंबोसह 9 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले यात 290 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोलंबोतील तीन चर्च आणि तीन हॉटेल्ससह 9 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले गेले. यात 500 हून जास्त नागरिक जखमी झाले आहेत.

रविवारी झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटावेळी भारताचा माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे श्रीलंकेत होता. ज्या हॉटेलवर हल्ला झाला त्याच हॉटेलमधून तो सकाळी 6 वाजता बाहेर पडला. त्यानंतर 8.45 च्य़ा सुमारास हॉटेल बॉम्बस्फोटाने हादरले. श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर अनिल कुंबळे भारतात परतला. याबाबतची माहिती त्याने ट्विटरवरून दिली आहे.

ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात भारतातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी तीन भारतीय बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर जखमी झालेल्यांपैकी आणखी 5 भारतीयांचा मृत्यू झाल्याचे समजते.

साखळी बॉम्बस्फोटामागे नॅशनल तौहिद जमात या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे श्रीलंकेच्या सुरक्षा दलाने म्हटले आहे. आतापर्यंत या प्रकरणी 26 जणांना अटक करण्यात आली आहे. सात ठिकाणी आत्मघाती हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.

राज ठाकरेंना जशास तसे उत्तर, 'लाव रे तो व्हिडिओ'

First Published: Apr 23, 2019 12:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading