जेव्हा भारताच्या एका गोलंदाजाने पाक टीमला गुंडाळले होते; पाहा व्हिडिओ

जेव्हा भारताच्या एका गोलंदाजाने पाक टीमला गुंडाळले होते; पाहा व्हिडिओ

आजच्या दिवशी 20 वर्षापूर्वी अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी: भारतीय क्रिकेट चाहत्यांना भलेही 7 फेब्रुवारी ही तारीख लक्षात नसेल पण अनिल कुंबळे हे नाव घेतल्यानंतर सर्वांच्या समोर येतो तो 'परफेक्ट 10'. आजच्या दिवशी 20 वर्षापूर्वी अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या.

VIDEO VIRAL : क्रिकेटच्या मैदानात विदर्भाचे खेळाडू म्हणतात,'How's the Josh?'

भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या अनिल कुंबळे याने सात फेब्रुवारी 1999 रोजी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर 'परफेक्ट 10'चा विश्वविक्रम केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 10 विकेट घेणारा कुंबळे हा जगातील दुसरा आणि भारताचा पहिला फलंदाज ठरला होता. त्याआधी जिम लेकर याने अशी कामगिरी केली होती.

विश्वास बसणार नाही; ऑस्ट्रेलियाचा संघ 10 धावांवर बाद झाला

कुंबळेने 26.3 षटकात 74 धावा देत 10 गडी बाद केले होते. त्यापैकी 9 षटके निर्धाव होती. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात भारताने पहिल्या डावात 252 धावा केल्या होत्या. पाकने पहिल्या डावात केवळ 172 धावा केल्या. दुसऱ्या डावात भारताने 339 धावा केल्या. विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा दुसरा डाव एकट्या कुंबळेने संपुष्ठात आणला आणि भारताला 212 धावांनी विजय मिळवून दिला. याच सामन्यातील पहिल्या डावात कुंबळेने 4 विकेट घेतल्या होत्या.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील या ऐतिहासिक क्षणाचा व्हिडिओ प्रत्येक भारतीयांसाठी रोमांचक असाच आहे.

First published: February 7, 2019, 4:16 PM IST

ताज्या बातम्या