धोनीच्या निवृत्तीवर कुंबळेचा निवड समितीला सल्ला, पंतच्या खेळाबद्दल म्हणाला...

धोनीच्या निवृत्तीवर कुंबळेचा निवड समितीला सल्ला, पंतच्या खेळाबद्दल म्हणाला...

महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवरून भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेने निवड समितीला सल्ला दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 08 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेनं म्हटलं आहे की, यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीची योग्य पद्धतीनं निवृत्ती द्यायला हवी. पण धोनी सध्या संघात दावा करू शकतो की नाही याबद्दल सांगता येणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. निवड समितीनं त्याच्या भविष्याबद्दल चर्चा करायला हवी. अनिल कुंबळे म्हणाला की, धोनीच्या निवृत्तीबद्दल निवड समितीनं त्याच्याशी चर्चा करायला हवी.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीच्या निवृत्तीची चर्चा होत आहे. निवड समितीनं भविष्याचा विचार करत त्याच्या निवृत्तीचे संकेत दिले आहे. धोनीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा अनिल कुंबळे म्हणाला की, पंतनं यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून त्याची दावेदारी केली आहे. त्यानं टी20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. यामुळं आता धोनीसोबत चर्चा करायला हवी. त्याची निवृत्ती सन्मानाने व्हायला हवी.

निवड समितीनं पुढच्या काही महिन्यात धोनीच्या भविष्याबद्दल स्पष्ट करायला हवं. संघासाठी निवड समितीनं इतर योजनांवर चर्चा करायला हवी. ही महत्वाचं असून याबद्दल योग्य माहिती द्यायला हवी. जर निवड समितीला वाटतं की धोनी टी20 वर्ल्ड कपसाठी तंदुरुस्त आहे तर त्याला प्रत्येक सामन्यात खेळायला दिलं पाहिजे. धोनीच्या निवृत्तीवर निवड समितीनं चर्चा करायला हवी आणि पुढच्या दोन महिन्यातच यावर बोलायला हवं असं कुंबळेनं म्हटलं आहे.

वर्ल्ड कपमध्ये भारताला सेमीफायनलमधून बाहेर पडावं लागलं होतं. त्यानंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. त्यानं दोन महिने विश्रांती घेतली असून विंडीज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली आहे.

VIDEO: गडचिरोली पाण्याखाली; काळजात धडकी भरवणारी पुराची विदारक दृश्यं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 11:39 AM IST

ताज्या बातम्या