अनिल कुंबळेचा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

अनिल कुंबळेचा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा

  • Share this:

20 जून : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादानंतर अखेर अनिल कुंबळेनं भारतीय टीमच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिलाय.

चॅम्पियन्स ट्राॅफी संपल्यानंतर अनिल कुंबळेनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्यास नकार दिला. ते लंडनमध्येच थांबले. बीसीसीआयने तिकीट बूक केल्यानंतर सुद्धा अनिल कुंबळे वेस्ट इंडिजला गेला नव्हता. त्याने 22 आणि 23 जून रोजी होणाऱ्या क्रिकेट समितीच्या बैठकीचं कारण पुढं केलं होतं.

दरम्यान, बीसीसीआयने टीम इंडियासाठी आधीच नव्या प्रशिक्षकपदासाठी शोधाशोध सुरू केला होता. नव्या कोचची निवड करण्याची जबाबदारी सल्लागार समिती सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यावर सोपवण्यात आलीये.

विराट कोहली आणि कुंबळेंमध्ये काय आहे वाद ?

आॅस्ट्रेलियाच्या विरुद्ध धर्मशाळा कसोटी मालिकेत विराट कोहली अनफिट असल्यामुळे कुंबळेंनी कुलदीप यादवला संधी दिली होती. तेव्हापासून विराट कोहली आणि अनिल कुंबळेंमध्ये धुसफूस सुरू आहे. विशेष म्हणजे, मॅच संपल्यानंतर विराटने पत्रकार परिषदेत रहाणे आणि कुंबळेंचं तोंडभरून कौतुक केलं होतं. पण, आता कुंबळेंच्या निर्णयावर कोहली नाराज होता हे  उघड झालंय. विराट आणि कुंबळेतल्या वाद शमवण्यासाठी सचिन तेंडुलकरने मध्यस्थी केली पण फारसा फरक पडला नाही.

बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेंवर नाराज

विशेष म्हणजे बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेंवर नाराज होते. बीसीसीआयचे अधिकारी चॅम्पियन्स ट्राॅफी खेळण्यास नकार देत होते. तेव्हा कुंबळेंनी सुप्रीम कोर्टाने स्थापन करून दिलेल्या संचालक समितीला टीम इंडिया खेळण्यासाठी तयार आहे अशी माहिती कळवली होती. त्यामुळे बीसीसीआयचे अधिकारी कुंबळेंवर नाराज झाले होते.

 

First published: June 20, 2017, 8:06 PM IST

ताज्या बातम्या