द्रविड प्रकरणावर अनिल कुंबळेनं BCCIला फटकारलं, म्हणाला...

द्रविड प्रकरणावर अनिल कुंबळेनं BCCIला फटकारलं, म्हणाला...

राहुल द्रविडला बीसीसीआय़ने हितसंबंध आड येत असल्याबद्दल नोटीस पाठवली होती.

  • Share this:

मुंबई, 09 ऑगस्ट : भारताचा माजी कर्णधार आणि अंडर-19चा मुख्य कोच राहुल द्रविडला बीसीसीआय़ने हितसंबंध आड येत असल्याबद्दल नोटीस पाठवली होती. याबाबत आता बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं या संदर्भात द्रविडवर गंभीर आरोप केले आहेत. द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख आहे.

द्रविडवर मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन सदस्य असलेल्या संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयच्या नियमांचं उल्लंघन करत हितसंबंध जपल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बीसीसीआय़कडून द्रविडला नोटीस पाठवण्यात आली होती. दरम्यान याबाबत आता अनिल कुंबळेनं प्रतिक्रिया दिली आहे. गोव्यातील ‘डिजिटल डायबेट्स रजिस्ट्री’च्या उद्घाटनप्रसंगी अनिल कुंबळेनं या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमा दरम्यान द्रविडच्या प्रश्नावर कुंबळेनं, “हितसंबंध प्रत्येक क्षेत्रात जोपासले जातात. काही वेळा ते बाहेर येतात तर काही वेळा ते दिसत नाहीत. क्रिकेटमध्येच असे घडते असे नाही. तसे झाल्यास इतर क्षेत्रातही कारवाई व्हायला हवी. ज्या खेळाडूंनी देशासाठी 300 हून अधिक सामने खेळले आहेत, असे क्रिकेटसाठी पुन्हा योगदान देणारे खेळाडू कमी आहेत. एवढे मोठे योगदान देणाऱ्या खेळाडूंवर असा आरोप करणे चुकीचे आहे”, असे मत व्यक्त केले. याआधी सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यावर परस्पर हितसंबंध जोपासल्याचा आरोप करण्यात आला होता.

वाचा-‘पैसे नाही घेत पण...’, BCCIच्या अधिकाऱ्याचे द्रविडवर गंभीर आरोप

द्रविडवर यामुळं केला जात आहे आरोप

द्रविड राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसोबत काम करतो. त्याशिवाय इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष असून या ग्रुपचा चेन्नई सुपर किंग्ज हा संघ खेळत आहे. याबद्दल राहुल द्रविडला मोटीस पाठवण्यात आली होती. हितसंबंध जपण्याच्या मुद्द्यावरून पाठवलेल्या नोटीसीला उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली होती. त्याच्या उत्तरानंतर पुढच्या कारवाईवर विचार करण्यात येईल असं बीसीसीआय़कडून सांगण्यात आलं होतं. द्रविडला 16 ऑगस्टपर्यंत उत्तर द्यावं लागणार आहे.

वाचा-'देवा, भारतीय क्रिकेटला वाचव', द्रविडला नोटीस पाठवल्यानंतर गांगुली BCCIवर भडकला

गांगुली आणि हरभजननं व्यक्त केला होता राग

बीसीसीआयनं द्रविडला नोटीस पाठवल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी राग व्यक्त केला आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने कठोर शब्दांत टीका केली आहे. भारतीय क्रिकेटपटूमंध्ये नवीन फॅशन आली आहे. चर्चेत राहण्यासाठी हितसंबंधाचा प्रश्न पुढं आणणे हा सर्वोत्तम मार्ग बनत चालला आहे. देवा, भारतीय क्रिकेटला वाचव असंही गांगुलीने म्हटंल आहे. भारताची द वॉल अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडला नोटीस पाठवल्याचं समजल्यानंतर भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनेसुद्धा बीसीसीआयवर हल्लाबोल केला आहे. भारतीय क्रिकेटला द्रविडसारखा चांगला माणूस मिळणार नाही. अशा प्रकारची नोटीस पाठवून द्रविडचा अपमान केला आहे. भारताच्या क्रिकेटला त्याची गरज आहे.

वाचा-अखेर BCCI झुकलं! नाडाच्या रडारावर येणार क्रिकेटपटू

VIDEO : महापुराचं भयावह दृश्य, मुक्या जनावरांचा ठिकठिकाणी खच

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 9, 2019 08:17 PM IST

ताज्या बातम्या