Home /News /sport /

अनिल कुंबळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, या मुद्द्यांवर झाली चर्चा

अनिल कुंबळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, या मुद्द्यांवर झाली चर्चा

भारताच्या काही क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला असला तरी बहुतेक जण यापासून लांबच राहणं पसंत करतात. भारताचा महान क्रिकेटपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) याने मात्र सोमवारी अमरावतीमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांची भेट घेतली.

पुढे वाचा ...
    अमरावती, 5 जुलै : भारताच्या काही क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला असला तरी बहुतेक जण यापासून लांबच राहणं पसंत करतात. भारताचा महान क्रिकेटपटू अनिल कुंबळे (Anil Kumble) याने मात्र सोमवारी अमरावतीमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांची भेट घेतली. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार या दोघांमध्ये खेळाच्या विकासावर चर्चा झाली. आंध्र प्रदेशमध्ये क्रीडा विश्वविद्यालयाची स्थापना झाली तर आपण याचं समर्थन करू, असं कुंबळेने आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं. अनिल कुंबळेने मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना खेळाचं सामान बनवणाऱ्या फॅक्ट्रीची स्थापना करण्याची विनंती केली. मेरठ आणि जलंधर सारख्या शहरांप्रमाणेच आंध्र प्रदेशमध्येही क्रीडा सामानाच्या कारखान्याची स्थापना केली, तर खूप मदत होईल, असं कुंबळेने सांगितलं. तसंच असा कारखाना स्थापन करण्यासाठी आपणही मदत करू, असं आश्वासन कुंबळेने मुख्यमंत्र्यांना दिलं. 50 वर्षांचा अनिल कुंबळे जगातल्या सर्वोत्तम स्पिनरपैकी एक होता. त्याच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 619 आणि वनडेमध्ये 337 विकेट आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्याने 35 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या, याशिवाय वनडेमध्येही त्याला दोनवेळा 5 विकेट मिळाल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या