मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IPL 2021: शांत Rahul Dravid संतापला, गाडीच्या काचा फोडल्या, विराटही धक्क्यात

IPL 2021: शांत Rahul Dravid संतापला, गाडीच्या काचा फोडल्या, विराटही धक्क्यात

राहुल द्रविड (Rahul Dravid) हा क्रिकेटमधला सगळ्यात संयमी खेळाडू म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या मैदानामध्ये राहुल द्रविडला राग अनावर झाल्याचं आपण कधीच पाहिलेलं नाही, पण आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू होण्याआधी केलेल्या एका जाहिरातीमध्ये राहुल द्रविडचा पारा चांगलाच चढल्याचं दिसत आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 9 एप्रिल: राहुल द्रविड (Rahul Dravid) हा क्रिकेटमधला सगळ्यात संयमी खेळाडू म्हणून ओळखला जातो. क्रिकेटच्या मैदानामध्ये राहुल द्रविडला राग अनावर झाल्याचं आपण कधीच पाहिलेलं नाही, पण आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू होण्याआधी केलेल्या एका जाहिरातीमध्ये राहुल द्रविडचा पारा चांगलाच चढल्याचं दिसत आहे. 'इंदिरानगर का गुंडा हूं मै' असं म्हणत ट्रॅफिकमध्ये अडकलेला राहुल द्रविड समोरच्या गाडीवर बॅटने मारत आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यानेही राहुल द्रविडचा हा व्हिडिओ शेयर केला आहे. राहुल द्रविडला या अवतारात कधीच बघितलं नव्हतं, असं विराट कोहली म्हणाला आहे.

राहुल द्रविडचं हे रूप क्रिकेट रसिकही पहिल्यांदाच बघत आहेत. द्रविड हा सध्या बँगलोरमध्ये एनसीएचा प्रमुख आहे. टीम इंडियाच्या नवोदितांना घडवण्याचं काम द्रविड चोखपणे करत आहे. राहुल द्रविडचेच अनेक शिष्य आता यावेळची आयपीएल गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला (IPL 2021) 9 एप्रिलपासून सुरूवात होत आहे. पहिलाच सामना गतविजेती मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (Mumbai Indians vs RCB) यांच्यात होत आहे. मुंबईने सर्वाधिक 5 वेळा आयपीएल जिंकली आहे, तर विराटच्या आरसीबीला एकदाही ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही.

First published:

Tags: Angry, Cricket news, IPL 2021, Mumbai Indians, Rahul dravid, RCB, Sports, Virat kohli