Home /News /sport /

VIDEO: 'या 5 वर्षांच्या मुलालाच आपण घेऊ या का '? Ashes मधील इंग्लंडच्या कामगिरीमुळे मायकल वॉन इतका नाराज झाला की...

VIDEO: 'या 5 वर्षांच्या मुलालाच आपण घेऊ या का '? Ashes मधील इंग्लंडच्या कामगिरीमुळे मायकल वॉन इतका नाराज झाला की...

वार्मअप मॅच मधील Team India ची खेळी पाहून इंग्लंडचा Michael Vaughan भलताच खुश

वार्मअप मॅच मधील Team India ची खेळी पाहून इंग्लंडचा Michael Vaughan भलताच खुश

Ashes मध्ये इंग्लंड संघाच्या वाईट कामगिरीमुळे फॅन्सपासून ते दिग्गज क्रिकेटर्स नाराज झाले आहेत.

  नवी दिल्ली, 17 जानेवारी- ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) पाच सामन्यांच्या Ashes Test Series मध्ये इंग्लंडच्या (England) बॅट्समननी लाजिरवाणी कामगिरी केली आहे. जो रूट (Joe Root) आणि डेव्हिड मलान (David Malan) यांच्याशिवाय इंग्लंडचा कोणताही बॅट्समन आपल्या क्षमतेनुसार खेळू शकला नाही. सहा डावांमध्ये इंग्लंडचा संघ 200 रन्सपर्यंतही पोहोचू शकला नव्हता. इंग्लंडच्या बॅट्समनची सर्वात वाईट कामगिरी तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या डावात पाहायला मिळाली. त्यात इंग्लंडचा संघ 68 रन्सवर तंबूत परतला होता. इंग्लंड संघाच्या या कामगिरीमुळे फॅन्सपासून ते दिग्गज क्रिकेटर्स नाराज दिसले. सीरिज संपल्यानंतर फॉक्स क्रिकेटने एका पाच वर्षांच्या मुलाचा बॅटिंग करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), मायकल वॉन (Michael vaughan) आणि शेन वॉर्न (Shane Warne) यांना टॅग करत विचारले की, "या मुलाकडून इंग्लंडचा संघ काही शिकू शकेल का"?

  Virat kohli successor: रोहित, राहुल किंवा पंत नव्हे हा खेळाडू म्हणाला, 'मी कॅप्टन व्हायला तयार'

  फॉक्स क्रिकेटने (Fox Cricket) ट्विट करून लिहिले, आम्हाला वाटते की, “पोम्स (इंग्लंड संघाचे टोपन नाव) या पाच वर्षांच्या मुलाकडून एक किंवा दोन गोष्टी शिकू शकतात का? आपले मत व्यक्त करा, सचिन तेंडुलकर, मायकल वॉन, शेन वॉर्न?” या व्हिडिओमध्ये एक पाच वर्षांचा मुलगा खूपच जबरदस्त क्रिकेटिंग शॉट खेळताना दिसत आहे. या ट्विटला रिट्विट करून मायकल वॉननेसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. मायकल वॉन लिहितो, “आपण याला त्वरित साईन करू शकतो का?” पाच सामन्यांच्या Ashes Test Series मध्ये इंग्लंडकडून कॅप्टन जो रूटने 5 सामन्यांमध्ये 32 च्या सरासरीने सर्वाधिक 332 रन्स बनवले होते. डेव्हिड मलानने 5 सामन्यात 38 च्या सरासरीने 244 रन्स काढले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड याने 4 सामन्यात 59.50 च्या सरासरीने 357 रन्स काढले होते. हेड याला प्लेअर ऑफ द सीरिज निवडण्यात आले होते. पॅट कमिन्स, स्कॉट बोलँड आणि कॅमेरून ग्रीन यांनी घेतलेल्या तीन-तीन विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला पाचव्या आणि अखेरच्या Ashes Test च्या तिसऱ्या दिवशी रविवारी 146  रन्सने हरवून सीरिज 4-0 अशी आपल्या नावावर केली होती.
  Published by:News18 Web Desk
  First published:

  Tags: Cricket, Cricket news

  पुढील बातम्या